Thursday, April 25, 2024
Homeनाशिककांदाप्रश्नी पंतप्रधानांना पत्र पाठवून आंदोलन

कांदाप्रश्नी पंतप्रधानांना पत्र पाठवून आंदोलन

लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon

कांद्यांला हमीभाव (Guaranteed prices for onions) मिळावा यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon Agricultural Produce Market Committee) प्रहार जनशक्तीच्या वतीने आज पंतप्रधानांना (Prime Minister) पत्रे पाठवून आंदोलन (agitation) करण्यात आले. कांद्याला 3 हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

- Advertisement -

आंदोलनप्रसंगी प्रहार जनशक्ति उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तु बोङके, जिल्हाअध्यक्ष शरद शिंदे., उपजिल्हाप्रमुख सागर निकाळे, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे, जिल्हा सरचिटणीस समाधान बागल, नाशिक शहरध्यक्ष शाम गोसावी, निफाङ तालुका अध्यक्ष दिगंबर वङघुले, तालुका उपाध्यक्ष राहुल सोनवणे, शेरखान मुलानी, तालुका सचीव अरुण थोरे, संघटक नाना सांगळे आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रती किलो कांदा (onion) पिकवण्यासाठी साधारण 20 ते 25 रुपये किलो खर्च येत असून सध्या कांद्याला सरासरी आठ ते दहा रुपये किलो भाव मिळत आहे.

मिळणार्‍या दरातून झालेला खर्चही निघत नसल्याने आर्थिक बजेट पूर्णता कोलमडले आहे.नाफेडच्या माध्यमातून 30 रुपये किलोने कांदा खरेदी करावा आणि मार्च ते मे महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला 500 रुपये क्विंटल अनुदान (Grants) द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या