Thursday, April 25, 2024
Homeनगरघोडेगावात कांद्याची आवक व भाव स्थिर

घोडेगावात कांद्याची आवक व भाव स्थिर

नेवासा (का. प्रतिनिधी)

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक व भाव स्थिर होते. काल ४३ हजार २१० गोण्या आवक झाली.

- Advertisement -

जास्तीत जास्त भाव ३२५० रुपयांपर्यंत निघाले. काल एक-दोन लॉटला ३१०० ते ३२५० रुपयांचा भाव मिळाला. मध्यम मोठा कलरपत्ती कांद्याला २५०० ते २८०० रुपये, मुक्कल भारी कांद्याला २३०० ते २४०० रुपये, गोल्टा कांद्याला १८०० ते २२०० रुपये, गोल्टी कांद्याला १८०० ते २१०० रुपये तर जोड कांद्याला ३०० ते ८०० रुपये भाव मिळाला. हलका डॅमेज कांद्याला २०० ते २५० रुपये भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या