Thursday, April 25, 2024
Homeनगरशेतकऱ्यांनी थेट कांदा लिलावच पाडला बंद

शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलावच पाडला बंद

वैजापूर | प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने कांदा उत्पादक शेतकरी यांना साडेतीनशे रुपयांचे अनुदान दिलेले आहे. अनुदानाची तारीख ही 31 मार्च असल्यामुळे आज शेतकऱ्यांनी वैजापूर बाजार समिती अंतर्गत असल्या कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढलेली होती. त्यात सकाळी कांद्याचा लिलाव सुरू असताना शेतकऱ्यांनी आणलेल्या कांद्याला योग्य तो भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला.

- Advertisement -

सुरुवातीला क्विंटल पाठीमागे चारशे ते पाचशे रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यात विशेष म्हणजे अनुदानाची रक्कम ही 31 मार्च पर्यंत मिळणार त्यामुळे साठवणूक केलेला कांदा घेऊन शेतकरी हा कांदा मार्केट मध्ये आलेला होता. भाऊ वाढ होत नाही हे बघून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले व लिलाव बंद पाडला. इतर मार्केटमध्ये कांद्याला चांगला भाव मिळतो परंतु वैजापूर मार्केटमध्ये कांद्याला भाव मिळत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. उद्या रामनवमीची सुट्टी असल्याने कांद्याची आवक वाढली होती.

धक्कादायक! ५ वर्षीय मुलाची हत्या करून बापाची आत्महत्या, पत्नीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न

दुपारी एक नंतर लिलावाला सुरुवात

शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने संतप्त होऊन शेतकऱ्यांनी आज सकाळीच कांदा लिलाव बंद पाडला होता. घोषणाबाजींनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ही घटना समजतात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रल्हाद मोटे, सहाय्यक सचिव एस के निकम यांनी धाव घेऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकरी हे ऐकण्यास तयार नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व व्यापारी सुरेश तांबे यांनी शेतकरी व व्यापारी यांच्यात मध्यस्थी केली. त्या नंतर लिलावाला सुरुवात होऊन कांद्याला आठशे रुपये भाव मिळाला.

अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या

शासनाकडून कांद्यासाठी अनुदानाची रक्कम मिळणार आहे म्हणून लिलाव सुरू केला : कांदा व्यापारी

खरे तर मार्चचा हिशोब असल्याकारणाने व्यापाऱ्यांनी तीन दिवस कांदा खरेदी करणे बंद केलेले होते. 31 मार्च नंतर कांदा खरेदी करण्यास व्यापारी सुरुवात करणार होते परंतु शासनाने जे शासकीय अनुदान कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले होते त्याची तारीख ही 31 मार्च असल्याकारणाने व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये व कांदा उत्पादक शेतकरी हा शासकीय अनुदानापासून वंचित राहू नये. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली असे कांदा व्यापारी यांनी सांगितले.

“बाळासाहेब ठाकरे, वाजपेयींना जमलं नाही ते…”; तानाजी सावंतांच्या दाव्याने नव्या वादाला तोंड फुटणार?

कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक

गेल्या सहा महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती वर प्रशासकाची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे देखील शेतकरी हे संतप्त झालेले होते. सहा महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाची निवडणूक झालेली नाही. त्यामुळे बाजार समितीला सभापती आणि उपसभापती नाही. पुढील महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पाडणार आहे.

वैजापूर-गंगापूर रस्त्यावर मृत्यू झालेल्या ‘त्या’ इसमाचा खुन

- Advertisment -

ताज्या बातम्या