Friday, April 26, 2024
Homeजळगावएक फोन... अन् 43 हजार लंपास

एक फोन… अन् 43 हजार लंपास

सोयगाव, Soygaon

फोन पे कंपनीकडून (Phone Pay Company) बक्षीस लागल्याचे (Rewarded) सांगून हिंदी भाषिक भामट्याने (Bhamtya) आरोग्य कर्मचाऱ्यास (health worker) कॉल चालूच असतांना अवघ्या पाचच मिनिटात ४३ हजार,१२९ रु स गंडविल्याची घटना (Incident of Gndavila) सोयगाव ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी आरोग्य कर्मचाऱ्याने औरंगाबाद येथील सायबर क्राईम (Cyber crime) विभागात दिलेल्या फिर्यादीवरून एका हिंदी भाषिक भामट्या विरुद्ध गुन्हा (crime) दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे सोयगावातील ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

रविराज शेळके असे फसवणूक झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नाव असून सोयगाव ग्रामीण रुग्णालयात ते दि.१३ कर्तव्यावर असतांना त्यांना सायंकाळी दीपक शर्मा या नावाने फोन पे कंपनीतून बोलतोय असे सांगून तुम्हाला कंपनीकडून ११९९ रु.चे बक्षिसासाठी पात्र असल्याचे सांगून फसवणूक दाराने कॉल वर नकार दर्शविताच त्यांनी आपणाला एक हजार ४२४ रु असा दंड आकारण्यात येईल असे सांगत त्यांनी रविराज शेळके यांना बोलण्यात गुंग ठेवून चालू कॉल वरच त्यांच्या फोन पे च्या संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र आणि ॲक्सिस बँक अशा दोन्ही बँकेतून दहा ट्रांझेक्षण द्वारे तब्बल ४३ हजार,१२९ रु अवघ्या पाचच मिनिटात चालू कॉल वरून रक्कम काढून फसवणूक करण्यात आली आहे.

रविराज शेळके यांनी औरंगाबाद येथील सायबर मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून एका अज्ञात हिंदी भाषिक भामट्या विरुद्ध सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित भामटा हा मुंबई(बी.के.सी) येथून बोलत असल्याचे सांगत असल्याचे फसवणूक झालेल्या रविराज शेळके यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यामुळे सोयगाव पोलीस आणि सायबरचे एक पथक मुंबई कडे तपासासाठी रवाना झाल्याचे सोयगावचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी सांगितले. या भामट्याने पाच मिनिटाच्या फोन कॉल मध्ये फसवणूक दाराचा मोबाईल हँग करून पूर्ण मोबाइल वर ताबा मिळविला होता.

संबंधित भामटा फसवणूकदाराचा फोन पे ऑनलाइन व्यवहाराची इत्यंभूत माहिती फसवणूक दारास देत होता हे विशेष! यामध्ये रविराज शेळके यांचे महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून बारा हजार,४४ इतकी रक्कम तर ॲक्सिस बँक खात्यातून २९ हजार ८५ इतकी रक्कम पाच मिनिटात भामट्याने कपात केल्याचे रविराज शेळके यांना कॉल संपल्यावर आलेल्या संदेशावरून निदर्शनास आले.

ओ.टी. पी न मागताच फसवणूक….नवीन फंडा

फोन पे वर ओ. टी. पी न मागताच फसवणुकीचा नवीन फंडा वापरण्यात येत असून एक रॅकेट सोयगाव तालुक्यात सक्रिय झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे त्यामुळे फोन पे वर ऑनलाइन व्यवहार करत असाल तर सावधान राहण्याचा इशारा सोयगाव पोलिसांनी दिला आहे.

सोयगाव तालुक्यात फोन पे अथवा गुगल पे द्वारे ऑनलाइन व्यवहार करत असतांना कोणताही संशय किंवा अनोळखी व्यक्तीचा या व्यवहारासंबंधी कॉल आल्यास तातडीने सोयगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अनोळखी व्यक्तींच्या आमिषे व प्रलोभनाला बळी पडू नका.

अनमोल केदार ,पोलीस निरीक्षक, सोयगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या