Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशकात एक लाख ३२ हजारांचे सोने लुटले

नाशकात एक लाख ३२ हजारांचे सोने लुटले

इंदिरानगर | Indiranagar

इंदिरानगर परिसरात पादचारी महिलांची सोनसाखळी बळजबरीने ओरबाडून नेल्याच्या घटना लगातार घडत असुन चोरट्यांनी महिलांना लक्ष्य केले आहे.

- Advertisement -

एकामागून एक सोनसाखळी च्या घटना वाढत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सराफ लॉन्स परीसरात महिलेचे

एक लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बळजबरीने ओरबाडून नेल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा दत्तु कोकणे (वय ५० रा . पुजा अर्पा.प्लॅट नं.११, भैरवनाथ नगर संसरीगांव देवळाली) ह्या लग्नासाठी सराफ लान्स समोर वडाळा -पाथर्डी रोडवर येथे आले असता (दि.९) रोजी संध्याकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कोकणे यांचा नातु रस्त्यावर गेला असल्याने त्याला पकडण्यासाठी रस्त्यावर आल्या.

त्याच वेळी समोरून काळी रंगाच्या पल्सर दुचाकीवरून दोन अनोळखी इसम त्यांच्या दिशेने आले. त्यापैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळयातील तीन तोळे वजनाचा सोन्याचा पोहे हार किंमत अंदाजे एक लाख वीस हजार रुपये, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी किंमत अंदाजे बारा हजार रुपये असे एकूण 1 लाख 32 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने ओरबाडून पळ काढला.

याप्रकरणी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश भामरे तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या