Wednesday, April 24, 2024
Homeधुळेबाम्हणे रेल्वेगेटजवळील अपघात एक ठार

बाम्हणे रेल्वेगेटजवळील अपघात एक ठार

दोंडाईचा Dondaicha। श.प्र.

शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे रेल्वे गेटजवळ (Bamhane railway gate) दुचाकी दुभाजकावर धडकल्यामुळे (accident) मोटार सायकल स्वाराचा(Motorcycle rider) जागीच मृत्यू (dies on the spot) झाला. तर मयताच्या भाच्याची पत्नी किरकोळ जखमी झाली. या अपघातात दोन वर्षाचा बालक मात्र बचावला आहे. भास्कर ओंकार कोळी (वय 40 वर्षे रा. मालपूर) असे मयताचे नाव आहे.

- Advertisement -

उंटावद ता. शिरपूर येथून भाच्याच्या पत्नीला घेऊन मालपूर तालुका शिंदखेड्याकडे एमएच 18 बीके 0069 क्रमांकाच्या दुचाकीने (bike) भास्कर कोळी हा येत असतांना दोंडाईचा नजिक बाम्हणे रेल्वे गेट जवळील दुभाजकाला दुचाकी (divider hit the bike) धडकली. या अपघातात भास्कर जागीच मयत झाला तर सोबत असलेली भाच्याची पत्नी दिव्या मुकेश कोळी (वय 30 वर्षे रा. उंदावद रा. शिरपूर) ही या अपघातात किरकोळ जखमी झाली.

तिला मुकामार लागला आहे. या भिषण अपघातात (accident) दोन वर्षीय बालक सुखरूप बचावला आहे. अपघातातचे वृत्त मालपूर परिसरात पसरताच ग्रामस्थांसह नातेवाईकांनी गर्दी केली. मयत भास्करचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक शुभम चित्तेंसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी पंचनामा केला.

वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाचेही निधन

तेरा दिवस अगोदरच भास्कर कोळी यांच्या वडिलांचे वृद्धपकाळाने निधन झालेे. दोन दिवसा आधीच वडिलांचे उत्तरकार्यही पार पडले. आता त्यानंतर मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने कोळी परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या