Wednesday, April 24, 2024
Homeजळगावएकाच श्वानाने घेतला १४ जणांना चावा

एकाच श्वानाने घेतला १४ जणांना चावा

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी –

तालुक्यातील खरजई गावात एकाच वेळी तब्बल १३ ते १४ जणांना (14 people) रस्त्यावरील श्वानाने (One dog) चावा (bit) घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा श्वान याच भागातील असला तरी मंगळवारी नेमका अचानक चावल्याने स्थानिकांना धक्का बसला आहे. हा कुत्रा पिसाळलेला असण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली.

- Advertisement -

धक्कादायक : साडे तीनशे बालकांच्या मृत्यूच्या कारणांची नोंद शासन दरबारी नाहीVISUAL STORY : सौंदर्याला वय असते की वयाला सौदर्य ? चक्रावलात ना ! मग या 42 वर्षीय अभिनेत्रीच्या अदा पाहाच…

कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काही नागरीकांनी धुळ्यात तर काहींना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती अशी खरजई गावात काल रात्री १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास गावात अचानक गावात काळ्या रंगाचे एक कुत्रा गावात पळत सुटले व घराबाहेर झोपलेल्या अनेक जणांना चावा घेतला.

या कारणांसाठी जिल्हा उपनिबंधकांना घालणार घेराव

सुमारे १३ ते १४ जणांना श्वानाने चावा घेतला. या अचानक घडलेल्या प्रकाराने संपूर्ण गाव जागे झाले. या श्वानाच्या हल्ल्यात सुरेश साहेबराव पवार (५०), बबन शंकर देशमुख (७२), हिरामण सुकदेव पिलोरे(७१), रोहन अरूण पवार (२३), शामराव सुकदेव काळे (६५), कडू भगवान लंके (७५), रामचंद्र ओंकार सुर्यवंशी (७३), ज्ञानेश्वर लक्ष्मण चव्हाण (४९), भास्कर पतींग पानकर (६०), राजेंद्र महादू बोबडे (५०), हरिष भिला शेजवळ (५२) व वैशाली नारायण पिलोरे (११) यांच्यासह काही ग्रामस्थ जखमी झाले.

धावत्या ट्रकला लागली आग अन् पुढे झाले असे काही….

यातील काही जखमींना चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात तर काही जखमींना धुळे येथे उपचारासाठी दाखल केले आहे. एकाच वेळी तब्बल १३ ते १४ ग्रामस्थांना श्वानाने चावा घेतल्याने गावात एकच खळबळ उडाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या