Sunday, April 28, 2024
Homeनाशिककृउबा सेवकांचा लाक्षणिक संप

कृउबा सेवकांचा लाक्षणिक संप

पंचवटी । वार्ताहर Panchavati

केंद्र शासनाने जून महिन्यात बाजार समितीच्या आवारा बाहेर धान्य, कडधान्ये, तेलबिया व शेतमाल नियमन मुक्त केला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

केंद्राच्या या निर्णयामुळे बाजार समितीच्या अडचणीत वाढ होणार आहे. तसेच समिती मधील सेवकांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी काल नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवकांनी एक दिवशीय लाक्षणिक संप केला.

केंद्र शासनाने जून महिन्यात बाजार समितीच्या आवारा बाहेर धान्य, कडधान्ये, तेलबिया व शेतमाल नियमन मुक्त केल्याने बाजार समितीच्या बाहेर होणार्‍या शेतमालाच्या खरेदी विक्रीवर सेस मिळणार नाही. बाजार समितीच्या उत्पनाचे मुख्य स्त्रोत मार्केट फी असून या व्यतिरिक्त अनुदान किंवा अर्थसहाय्य शासनाकडून मिळत नाही.

या मुळे सेवकांचे वेतन, लाईट, पाणी, साफसफाई, सुरक्षा आणि इतर मूलभूत सुविधा देण्यास अडचण निर्माण होणार आहे. तसेच राज्यातील बाजार समितीचे सेवकांना शासन सेवेत समाविष्ट करण्यासाठी गठीत केलेल्या समितीचा अहवाल शासनाकडे सादर करून देखील आजपावेतो कार्यवाही झाली नाही.

याचा निषेध व्यक्त करण्यासाठी समितीच्या प्रवेशद्वारावर निषेध व्यक्त करीत रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पंचवटी पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देत सोडून दिले.

या आंदोलनात सचिव अरुण काळे, पी.एन.घोलप, एस. एल. बागुल, आर.जी.धोंगडे, एम.एम.निकाळे, आर.जी.रहाडे, संघटनेचे विभागीय अध्यक्ष निलेश दिंडे, विक्रम काकड आदींसह सेवक सहभागी झाले होते. दरम्यान आजच्या लाक्षणिक संपामुळे शेतमालाचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या