Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशेतकरी एकवटले, कांदा विक्री बंद आंदोलन होणारच

शेतकरी एकवटले, कांदा विक्री बंद आंदोलन होणारच

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कांद्याला (Onion) गेल्या अनेक महिन्यांपासून सतत कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारचे (Central & State Government) कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांकडून कांदा विक्री बंद आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे (Bharat Dighole) यांनी दिली आहे…

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, मंगळवारी (दि. 16) एका दिवसासाठी कोणत्याही कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला कांदा बाजार समितीत (Market Committee) विक्रीसाठी घेऊन जायचा नाही. सर्व कांदा उत्पादकांनी राज्यातील व केंद्रातील सरकारला या दिवशी दाखवून द्यायचे आहे की आपण सर्व कांदा उत्पादक शेतकरी आता कांदा प्रश्नावर लढण्यासाठी संघटित झालेलो आहोत.

मेटेंच्या अपघातानंतर धक्कादायक माहिती समोर; काय घडलं शेवटच्या एक तासात?

हे कांदा विक्री बंद आंदोलन (Agitation) फक्त आणि फक्त 16 ऑगस्ट या एकच दिवस होणार असून शेतकरी बांधवांनी बुधवार दिनांक 17 ऑगस्ट 2022 पासून आपापला कांदा विक्रीसाठी घेऊन जायचे आहे. गेल्या 75 वर्षात शेतकरी एक दिवस मार्केटला स्वतःहून कांदा विक्रीसाठी घेऊन आले नाही, असे पहिल्यांदाच होणार असल्याचे दिघोळे यांनी स्पष्ट केले आहे.

नाशकात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

- Advertisment -

ताज्या बातम्या