Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकक्रीडा साहित्यासाठी 25 गावांना दीड कोटी

क्रीडा साहित्यासाठी 25 गावांना दीड कोटी

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

देवळाली विधानसभा मतदारसंघातील (Deolali Assembly constituency) 25 गावांच्या व्यायाम शाळांना (Gym) क्रीडा साहित्य (Sports equipment) घेण्यासाठी शासनाच्या क्रीडा विभागाकडून (Government Sports Department) तब्बल 1 कोटी 36 लाखाचा निधी (1 crore 36 lakhs Fund) मंजूर करण्यात आल्याची माहिती आ. सरोज आहिरे (MLA Saroj Ahire) यांनी दिली…

- Advertisement -

देवळाली मतदारसंघात प्रत्येक गावात युवकांसाठी क्रीडांगण व साहित्य उपलब्ध व्हावे जेणे करून युवा पिढी व्यसनाधीन (Addicted) न होता व्यायाम प्रेमी होतील.

या उद्देशाने क्रीडा विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यास शासनाने सकारात्मक प्रतिसाद (Positive response) देऊन पहिल्या टप्प्यात 25 गावांना क्रीडा साहित्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी गणेशगाव (Ganeshgaon) येथे 6 कोटींचा पूल, तसेच 51 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आल्या. आता 25 गावांना क्रीडा साहीत्यासाठी निधी मंजूर झाला आहे.

त्यात पिंपळद, महादेवपूर, दहेगाव, कालवी, गणेशगाव, गिरणारे, शेवगे दारणा, मुंगसरे, सय्यद पिंप्री, धोंडेगाव, साडगाव, बेलदगव्हान, शिलापूर, ओढा, चांदगिरी, जातेगाव, बेळगाव ढगा, कोटमगाव, सामनगाव, मातोरी, संसरी, गावळणे, नासाका शाळा, भगूर न. पा. तालुका क्रीडा संकुल आदींचा समावेश आहे.

पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात क्रीडा साहित्य निधी उपलब्ध झाला आहे. उर्वरित गावांनादेखील लवकरच असा निधी प्राप्त करून देणार असल्याचे आ. आहिरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या