Wednesday, April 24, 2024
Homeनगरएक देश एक रेशनकार्ड प्रचार व प्रसार मोहिमेस श्रीरामपुरात प्रारंभ

एक देश एक रेशनकार्ड प्रचार व प्रसार मोहिमेस श्रीरामपुरात प्रारंभ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

केंद्र शासनाने सुरू केलेल्या एक देश एक रेशनकार्ड या योजनेचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता

- Advertisement -

श्रीरामपूर तहसील कार्यालय तसेच स्वस्त धान्य दुकान याठिकाणी विशेष मोहीम राबविण्यात आली.

शासनाच्या वन नेशन वन रेशन या योजनेंतर्गत आता रेशन कार्डधारकाला सोयी नुसार कुठल्याही धान्य दुकानात आपल्या हक्काचे धान्य खरेदी करता येणार आहे. यापूर्वी ज्या स्वस्त धान्य दुकानात संबंधित कार्डधारकांचे रेशनकार्ड होते त्याच स्वस्त धान्य दुकानातून माल खरेदी करावा लागत होता.

काही कारणास्तव कार्डधारक बाहेरगावी गेला तर पॉज मशिनवर अंगठा न देता आल्यामुळे संबंधित कार्डधारकाला अन्न धान्यापासून वंचित रहावे लागत होते. अनेक नागरिक रोजगाराच्या शोधार्थ एका राज्यातून दुसर्‍या राज्यात एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जात असत.

त्याठिकाणी रोजंदारीची कामे करत असताना त्या कुटुंबाचे रेशनकार्ड असून देखील त्यांना चढ्या भावाने धान्य खरेदी करावे लागत होते. या बाबींचा शासनाने गांभीर्याने विचार करून संपूर्ण भारत देशात एक देश एक रेशनकार्ड ही योजना सुरू करण्याची संकल्पना सुरू केली.

सुरुवातीला काही राज्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू केली. या योजनेला मिळालेला प्रतिसाद पहाता आता सर्वत्र ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर या योजनेचा प्रचार व प्रसार करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आल्या.

अहमदनगरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी तातडीने सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना या योजनेची माहिती देण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या सुचनेनुसार श्रीरामपूर तहसील कार्यालय, तालुक्यातील धान्य दुकाने याठिकाणी फलकाव्दारे जनजागृती करण्यात आली.

उपविभागीय आधिकारी अनिल पवार, तहसीदार प्रशांत पाटील यांच्या सूचनेनुसार पुरवठा अव्वल कारकून चारुशिला मगरे, गोदामपाल शिवाजी वायदंडे, पुरवठा निरीक्षक अतुल भांगे, पुरवठा विभागाचे शिवशंकर श्रीनाथ, धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, लाला गदिया, नरेंद्र खरात, माणिक जाधव, किशोर छतवाणी, दक्षता समितीचे संदीप वाघमारे यांच्या उपस्थितीत फलकाद्वारे या योजनेची माहिती लाभधारकांना देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या