Friday, April 26, 2024
Homeजळगावहातगाव येथे तृतीयपंथीयाकडून एकास मारहाण

हातगाव येथे तृतीयपंथीयाकडून एकास मारहाण

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील हातगाव पोलिसात तक्रार दिल्यांच्या कारणावरुन एकास व त्यांच्या कुटुंबाला तृतीपंथीसह सात जणांनी जबर मारहाण केली आहे. हि घटना दि.२४ रोजी घडली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

भगवान गंगाधर आव्हाड रा.हातगाव यांच्या पत्नीला जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून पत्नीने दि,६ रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा (Crime) केला होता. याच करणावरुन सिमा संजय ताटे, विशाल संजय ताटे, मुस्कान उर्फ दुर्गा शेख(तृतीयपंथी), रुबिना शेख( तृतीयपंथी), गौरी बागडे (तृतीयपंथी), लक्ष्मी शेख (तृतीयपंथी), माईन शेख( तृतीयपंथी) सर्व रा. मनमाड , आशानी हातगाव येथे येवून फिर्यादीला तुझा पत्नीने आमच्या विरोधात दिलेली केस मागे घ्यायाला लाव असे सांगून वाद घातला. व शिवीगाळ करुन हातातील लाठ्या काठ्या, (sticks) कोयते, तलवारीने (swords) फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भगवान गंगाधर आव्हाड यांच्या फिर्यादीवरुन वरील सात जणांविरोधात भादवी कलम २६,३२४,४२७,१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या