Thursday, April 25, 2024
Homeनाशिकचोरी प्रकरणी चार महिलांसह एक जण ताब्यात

चोरी प्रकरणी चार महिलांसह एक जण ताब्यात

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

बांधकाच्या साहित्याची चोरी (Theft of construction materials )करणाऱ्या चार महिलांना अंबड पोलीस ठाण्याच्या ( Ambad Police Station ) गुन्हे शोध पथकाने सापळा रचत अटक करून त्यांनी सदर मुद्देमाल ठेवलेल्या व्यक्तीला देखील अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत (दि.७ एप्रिल ) पहाटे २ ते ५ वाजेच्या सुमारास पद्मश्री रो-हाउस ग्लोबल स्कुलच्या मागे अंबड नाशिक येथील साईटवरील सेन्ट्रींग कामासाठी ठेवलेल्या एकुण ७० लोखंडी प्लेट अज्ञात चोरटयाने चोरी केल्याबाबत किशारे गणपत वैष्णव ( ५२, धंदा ठेकेदार, रा. शिवराजे बिल्डींग नं ०५, रूम नं ०७, दुर्गानगर आर टी ओ ऑफिस जवळ, पेठरोड, नाशिक ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता .

या गुन्हयांत महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांना सूत्रांकडून समजले होते. सदर संशयित महिलांबाबत सपोनी गणेश शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निबांळकर (गुन्हे), पोलीस निरीक्षक नंदन बगाडे (प्रशासन) यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सपोनी गणेश शिंदे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार किरण गायकवाड, जनार्धन ढाकणे,

मछिंद्र वाकचौरे, राकेश राउत, मोतीराम वाघ, मुकेश गांगुर्डे, तुळशीराम जाधव, संदीप भुरे,कुणाल राठोड ,प्रशांत नागरे,नितीन सानप,योगेश शिरसाठ,सोनावणे , नितीन सानप व महिला अंमलदार विमल पाचोरे, अश्वनी भोसले यांनी सापळा रचत ०४ महिलांना ताब्यात घेवून गुन्हयातील मुद्देमाल किसन सुभाष चाफळकर ( रा. वरचे चुंचाळे, आंबेडकर नगर ) याच्याकडुन हस्तगत केला. याप्रकरणी पुढील तपास कैलास चव्हाण,अमिर शेख हे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या