Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्र‘ओमिक्रॉन’ने जगभरात दहशतीचं वातावरण; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

‘ओमिक्रॉन’ने जगभरात दहशतीचं वातावरण; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई l Mumbai

करोनाचा नवा व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’मुळे (covid19 new variant omicron) सध्या संपूर्ण जगात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

- Advertisement -

‘ओमिक्रॉन’चा (omicron) उद्रेक झाल्याने काही देशांनी निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या देशांमध्ये करोनाचा नवा विषाणू सापडला आहे त्यांच्यावर काही देशांनी प्रवासासाठी निर्बंध लावले आहेत. करोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा (covid19 new variant) संसर्ग वाढू नये यासाठी कडक पावलं उचलण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातही सरकारनं (State Government) नवीन नियमावली जारी केली असून सरकारही सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बैठक घेणार आहेत.

आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातल्या करोना परिस्थितीवर तसंच नव्या व्हेरिएंटमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतील. या बैठकीस राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित असतील. तसेच दक्षिण आफ्रिकेतून सुरु असणाऱ्या विमान सेवेवर बंद घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जातील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या