Wednesday, April 24, 2024
HomeनगरOmicron : 86 आंतरराष्ट्रीय प्रवासी हाय रिस्कमध्ये

Omicron : 86 आंतरराष्ट्रीय प्रवासी हाय रिस्कमध्ये

अहमदनगर l प्रतिनिधी

ऑमिक्रानचा उगम असणार्‍या देशातून अथवा मोठ्या प्रमाणात असणार्‍या देशातून जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेले 86 प्रवासी हाय रिस्कमध्ये आहेत.

- Advertisement -

शुक्रवार (दि.10) रोजी आणखी 24 प्रवाासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती राज्य पातळीवरून आरोग्य विभागाला प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 156 आंतरराष्ट्रीय प्रवासी जिल्ह्यात आलेले असून त्यापैकी 130 प्रवाशांना शोधण्यात यश आले असून उर्वरित 26 जणांचा शोध सुरू आहे.

करोनाचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’ची लक्षणे काय?, कशी घ्याल काळजी?

ऑमिक्रानचा धोका टाळण्यासाठी राज्य पातळीवरून 3 डिसेंबरपासून जिल्ह्यात आंतराष्ट्रीय प्रवास केलेल्यांची यादी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला पाठविण्यात येत आहे. या यादीनूसार आलेल्या प्रवाशांचे स्त्राव घेवून त्यांची करोना चाचणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 121 जणांची चाचणी झालेली असून ते सर्व करोना निगेटिव्ह आहेत. तर 9 प्रवाशांची चाचणीचा अहवाल येणे बाकी आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटवर Covishield प्रभावी आहे का? अदर पूनावाला म्हणाले….

तर दुसरीकडे आफ्रिका अथवा ऑमिक्रानचा अधिक प्रार्दुभाव असलेल्या देशातून आलेल्यांची संख्या ही 86 असून अन्य देशातून आलेल्यांची संख्या ही 70 आहे. त्यांना आरोग्य विभागाने लो रिस्कमध्ये ठवेलेले आहे. शोध सुरू असणार्‍यांमध्ये कोपरगाव 3, राहाता 2, राहुरी 1, नगर मनपा 18, शेवगाव आणि श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Omicron : दिलासा! राज्यात आढळलेला पहिला ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटग्रस्त रूग्ण करोनामुक्त

आतापर्यंत आलेले प्रवासी

अकोले 6, कोपरगाव 13, राहाता 15, राहुरी 10, संगमनेर 13, श्रीरामपूर 15, नगर शहर 60, नगर ग्रामीण, शेवगाव प्रत्येकी 2, कर्जत 1, नेवासा 7, पाथर्डी 5, पारनेर 6, श्रीगोंदा असे 156 आंतरदेशीय प्रवासी जिल्ह्यात दाखल झालेले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या