Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाOlympics : रवी दहियाला रौप्यपदक; याआधी कोणत्या कुस्तीपटूंनी भारतासाठी आणलंय पदक?

Olympics : रवी दहियाला रौप्यपदक; याआधी कोणत्या कुस्तीपटूंनी भारतासाठी आणलंय पदक?

दिल्ली | Delhi

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) कुस्तीच्या ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात (Wrestling Final Match) भारताचा (India) कुस्तीपटू रवी कुमार (Ravi Dahiya) दहियाचा पराभव झाला.

- Advertisement -

video पंतप्रधान मोदींचा हॉकी टीमला फोन, म्हणाले…

रवीकुमार दहियाचा अंतिम सामना रशियन जावूर युगुयेवशी (Zaur Uguev) झाला, पण युगुयेवने (Uguev)आपला अनुभव पणाला लावत ही लढत ७-४ने जिंकली. रवीला रौप्यपदकावर (Wrestler Ravi Dahiya wins silver medal) समाधान मानावे लागले असून भारताच्या खात्यात अजून एका पदकाची नोंद झाली आहे.

रवी कुमार दहीया (Ravi Kumar Dahiya) हा कुस्तीमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. तर ऑलिम्पिक कुस्ती (Olympic wrestling) खेळात भारताचे हे सहावे पदक ठरले. खाशाबा जाधव (Khashaba Jadhav), सुशील कुमार (Sushil Kumar), योगेश्वर दत्त (Yogeshwar Dutt) आणि साक्षी मलिक (Sakshi Malik) यांनी या खेळात भारताला पदक जिंकून दिले होते.

खाशाबा जाधव भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे पहिले कुस्तीपटू होते. त्यांनी १९५२ मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये (Helsinki Olympics 1952) हा कारनामा केला होता.

Tokyo 2020 Hockey : भारतीय हॉकी संघाने घडवला इतिहास; देशभरात जल्लोष, पाहा व्हिडिओ

सुशील कुमारने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सलग दोन वेळा पदक जिंकलं. सुशीलने २००८ बिजिंग ऑलिम्पिकमध्ये (Beijing Olympics 2008) कास्य तर २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये (London Olympics 2012) रौप्य पदक जिंकलं होतं.

तर २०१५ रिओ ऑलिम्पिकमध्ये (Rio 2016 Summer Olympics) साक्षी मलिकने कास्य पदक जिंकले होते. आता रवी कुमार दहियाने भारतासाठी सहावं पदक जिंकलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या