Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनवीन कामगार कायद्याचा नाशिकमध्ये फटका : ’ हा ’ कारखाना बंद

नवीन कामगार कायद्याचा नाशिकमध्ये फटका : ’ हा ’ कारखाना बंद

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

केंद्रातील नवीन लेबर कोडचा फटका राज्यातील अनेक कंपन्या करण्यातून बसणार आहे. सातपूरमध्येही पेपर मशीन वायर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना १ जानेवारी २०२१ पासून कंपनी बंदची नोटीस देऊन नाशिकमध्ये पहिला झटका दिला आहे.

- Advertisement -

कंपनी व्यवस्थापनाने अचानक टाळे लावल्याची सूचना झळकताच कामगारांवर बेरोजगारीचे गंभीर संकट ओढवले आहे. नाशिकमध्ये यापूर्वीही असेच प्रकार थोड्या-बहुत फरकाने घडत होते मात्र केंद्र सरकारच्या नव्या लेबर कोड मुळे हा पहिला फटका नाशिकला बसला आहे.

या प्रकरणी कामगार उपायुक्त कार्यालयात १० डिसेंबर रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू आणि मंत्रालयात देखील या कंपनी विरोधात प्रहार कामगार संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे.

23 मार्चपासून देशभरात करोनामुळे लॉकडाऊन सुरु झाला. त्यानंतर जुनच्या पहिल्या आठवडयात औद्योगिक वसाहतींना अटीशर्तींसह कंपन्या सुरु करण्याची परवानगी देण्यात आली.

दोन महिन्यापूर्वी सातपूर येथील काही कंपन्या बंद पडल्याने कामगार आधीच अडचणीत आले होते. आता केंद्राच्या नव्या धोरणामुळे आणखी एका कंपनीला टाळे लागल्यामुळे कामगार चिंताक्रांत झाले आहे. याबद्दल कामगार संघटनांनी देखिल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

येत्या १० डिसेंबर रोजी नाशिकच्या कामगार उपायुक्त कार्यलयात याप्रश्नी व्यवस्थापन, कामगार संघटना आणि कामगारांची बैठक होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत कंपनी बंद होऊ देणार नाही.

अनिल भंडागे, राज्यअध्यक्ष, प्रहार वर्कर्स युनियन

- Advertisment -

ताज्या बातम्या