Friday, April 26, 2024
Homeनाशिक११ व्या मजल्यावरून उडी मारून वृद्धाची आत्महत्या

११ व्या मजल्यावरून उडी मारून वृद्धाची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी

आजारास कंटाळून वृद्धाने इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पाथर्डी शिवार परिसरात गुरूवारी पहाटे घडली.

- Advertisement -

तिलकराज लाम्बा (८१, रा. कर्मा रेसिडेन्सी, पाथर्डी शिवार) असे आत्महत्या करणार्‍या वृद्धाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लाम्बा यांना अनेक वर्षांपासून हृदरोग व गुडघे दुखीचा त्रास होता.

यास कंटाळून त्यांनी राहत्या घराच्या ११ व्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार भोजणे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या