Friday, April 26, 2024
Homeजळगावचाळीसगाव : लेबल नक्कलच्या संशयावरुन तेलसाठा सील

चाळीसगाव : लेबल नक्कलच्या संशयावरुन तेलसाठा सील

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

धुळे येथील संजय सोया प्रायव्हेट लिमीटेड या खाद्य तेल उत्पादन करणार्‍या कंपनीच्या लेबलची (लोगो) नक्कल करुन, तेल विक्री करत असल्याच्या संशयावरुन चाळीसगाव येथील ‘ सोयाअमृत ’ या तेलाची विक्री करणार्‍या खान्देश ऑईलमिल मध्ये नारायणी ट्रेडींग कंपनीतील जवळपास पाच ते सहा लाखांचा तेल साठा मुंबई हायकोर्टाकडून आलेल्या दोन जणांच्या पथकाने तपासणीसाठी सील केला आहे. परंतू आम्ही कुठल्याही प्रकारची नक्कल केली नसल्याचा दावा सोयाअमृतचे मालक कृष्णकुमार माहेश्‍वरी यांनी केला आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोयाअमृत या नावाने तेलाचे प्रॉडक्ट तयार होत असल्याच्या धुळे एम.आय.डी.सी. मधील संजय सोया प्रा.लि. या खाद्यतेल उत्पादन करणार्‍या कंपनीने मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या तक्रारीनंतर आज मुंबई हायकोर्टाने नेमणूक केलेल्या पथकाने चाळीसगांव येथील एकेकाळच्या खान्देश ऑईलमिल मधील नारायणी ट्रेडींग कंपनी मधील ऑईल युनिट मध्ये तपासणी केली.

जवळपास पाच ते सहा लाख रुपयांच्या तेलसाठ्यासह सोयाड्रॉप सारखे दिसणारे मात्र सोयाअमृत नावाचे लेबल जप्त केले. दरम्यान सोयाअमृतचे मालक कृष्णकुमार कुंजीलाल माहेश्वरी हे कोर्टाच्या पथकाला सर्वोत्तपरी सहकार्य करताना दिसून आले.नवीन कंपनी स्थापन केल्यामुळे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे आधिकृत कागदपत्र नसल्याचे यावेळी दिसून आले.

तसेच या कंपनीत इतर नावाने असलेला तेलाचा साठा देखील तपासणीसाठी सील करण्यात आला आहे. दरम्यान ऐन दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर कारवाई केल्यामुळे माझे मोठे आर्थिक नूकसान होणार असल्याची चर्चा तेलविक्रेत्यांमध्ये होती.

प्रतिक्रिया-

आमच्या ब्रॅन्ड हा सोयाअमृत आहे, आम्ही आमच्या सोयाअमृत नावाच्या तेलाचे उत्पादन गेल्या १५-२० दिवसापूर्वी सुरु केले आहे. तर रजिस्टेशनसाठी आम्ही १५ दिवसापूर्वीच प्रस्ताव पाठवला आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचे भेसळयुक्त किवा कोणाचीही फसवणूक करुन तेलाचे उत्पादन तयार केलेले नाही, परंतू ऐन दिवळीच्या पार्श्‍वभूमीवर आमचा माल तपासणी घेतल्यामुळे आमचे मोठे आर्थिक नूकसान होणार आहे. शेवटी आमचा न्यायदेवेतर विश्‍वास आहे, कोर्ट जो आदेश करेल तो आम्हाल मान्य राहिल.

कृष्णकुमार कुंजीलाल माहेश्वरी

- Advertisment -

ताज्या बातम्या