Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : सटाण्यातील भांगडिया ऑईल मिल ला भीषण आग

Video : सटाण्यातील भांगडिया ऑईल मिल ला भीषण आग

नाशिक /सटाणा | Nashik/Satana

सटाणा देवळा (Satana deola road) रस्त्यावरील शेंगदाणा ऑईलला (oil mill) दुपारच्या सुमारास मोठी आग लागली आहे. (fire) सद्यस्थितीत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन विभागाची (Fire Department) वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत….

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, सटाणा (Satana) शहरापासून ३ किलोमिटर अंतरावर कंधाने (kandhane) फाट्यासमोर भांगडीया शेंगदाणे ऑईल (Bhangdia shengdana oil mill) मिल आहे. ऑईल मिलमध्ये शॉक सर्कीट झाल्यामुळे आगीचा भडका उडाला. शेंगदाणा भुशासह इतर सामग्री याठिकाणी असल्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले.

आग विझवण्यासाठी सटाणा व मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच परिसरातील खासगी ट्रँकरद्वारे देखील आगीवर पाणीचा मारा केला जात आहे.

अजूनही आग धुमसतच असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मच्या-यांसह परिसरातील नागरीकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या