Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधहातावरील संतान रेषा व चिन्ह

हातावरील संतान रेषा व चिन्ह

प्रफुुुल्ल कुलकर्णी-ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड,8888747274

हस्तसामुद्रिक शास्त्रात हातावर संतान रेषा व चिन्हे असतात, संतान होईल का याचे उत्तर व संतान होत नाही, कधी होईल होईल किंवा नाही यासाठीच्या प्रश्नाचे उत्तर सामुद्रिक शास्त्रात अचूक देता येतात. संतान किंवा मूल न होण्याची समस्या खेड्यापेक्षा शहरात जास्त आहे. मूल होत नाही म्हणून समाजामध्ये पुरुषाकडे वेगळ्या नजरेने पहिले जाते, विवाहीत स्त्रीला सुद्धा हिणविलें जाते. लग्न झाल्यानंतर दोन पांच वर्ष मूल होऊ द्यायचे नाही अशी तरुण पिढीची मानसिकता आहे, त्यातल्या त्यात दोघेही नोकरी करत असतील तर त्यांचे निदान पंचवार्षिक नियोजन असते दोंघांनीही इतक्यात मूल नको म्हणून ठरवून टाकलेले असते.

- Advertisement -

माझ्या पाहण्यात असे आले की विशेषतः आय टी क्षेत्रातील जोडप्यांना विवाहानंतर पाच सात वर्षे मूल न होण्यासाठी प्रतिबंधात्मक औषधे घेतली जातात, त्याचा महिलेच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो, दुसरे असे कि आय टी क्षेत्रात काम करताना दोघांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या असतात, एकाला रात्री तर एकाला दिवसा काम करावे लागते. अश्या परिस्थितीत दोघांचे शांततेने एकत्र येणे होत नाही हेही कारण आहे. नवरा बायको दोघेही नोकरी करत असतील तर,स्त्रीला स्वयंपाक घरातून सुटका नसते, त्यात सासरे घरात असतील तर सुनेने सर्व घर सांभाळावे अशी त्यांची भावना असते यात स्त्रीला विश्रांती मिळत नाही, याचा परिणाम सुद्धा होतो, अश्या वेळेस मूल झाल्यानंतर त्याची जवाबदारी आईलाच घ्यावी लागते.

नवरा बायको त्यांच्या अत्यंत कष्टदायक कामातून इतके थकून जातात कि मुलं होण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न अपुरे पडतात. लग्नाला आठ दहा वर्षे लोटले कि काही दाम्पत्य भानावर येतात मग डॉक्टरी ट्रीटमेंट घेतली जाते मूल होण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न होतात, या प्रयत्नांत मनात शंका कुशंका येतात व मग ते ज्योतिष्याकडही जातात. भाग्यात मूल आहे का हो म्हणून विचारणा करतात अश्या वेळेस सर्व प्रथम, जोडपे गर्भधारणेसाठी सक्षम आहे का नाही अथवा काही दोष आहे का? दोघापैकी एकात दोष आहे का हे पाहावे लागते आणि अश्या वेळेस हस्तसामुद्रिकदृष्ट्या संतानक्षम हातावरील रेषा व चिन्हे पहिली जातात. हातावरील संतान रेषा व चिन्हे शंभर टक्के खात्रीने मूल होण्याच्या दृष्टीने काही रेषा चिन्हे हातावर असतात.

फोटोत दाखविलेल्या 1 नंबरच्या बाणाने हृदय रेषेचा शेवट बर्‍याच रेषांनी झाला आहे म्हणजे पुरुषत्व आहे, परंतु हृदय रेषेच्या वरची विवाह रेषा बिघडलेली आहे व त्याच बरोबर दोन नंबरच्या बाणाने शुक्र ग्रहाचा घेरा आयुष्य रेषेचा एक फाटा आत आल्याने शुक्राचा आकार कमी झालेला आहे शुक्र ग्रहाचा आकार आयुष्य रेषेने छोटा केला असता संतान होण्यात बाधा निर्माण होते. याच शुक्र ग्रहावर 3 नंबरच्या बाणाने दाखविलेली शुक्र ग्रहाला छेदलेला एक जाडसर रेषा आहे, हि रेषा संपूर्ण वक्राकार शुक्र ग्रहाला छेदून हृदय रेषेला जाऊन मिळालेली आहे, या रेषेुळे शुक्र ग्रहात दोष निर्माण झाला आहे त्यामुळे या जातकाला संतान होऊ शकली नाही.

नंबरच्या बाणाने दाखविलेल्या विवाह आहे या विवाह रेषेच्या वर नंबर 1 च्या बाणाने दाखविलेल्या उभ्या तीन रेषा आहेत, त्यापैकी दोन ठळक व एक थोडी फिक्कट व पातळ आहे, ठळक रेषा मुलगा अपत्य दाखविते व पातळ उभी रेषा मुलगी अपत्य दाखविते. या रेषा खूप थोड्या लोंकाच्या हातावर स्पष्ट सापडतात साध्या डोळ्याने दिसतात मात्र जास्त करून विवाह रेषेवरील या सूक्ष्म फिक्कट व पातळ पोताच्या असतात भिंगाच्या आधारानेच त्या स्वच्छ दिसून येतात.

3 नंबरच्या बाणाने दाखविलेला हृदय रेषेचा शेवट आहे, हृदय रेषेचा शेवट गायीच्या शेपटाप्रमाणे हृदय रेषेच्या शेवटी असतील तर रेषा, हाताच्या कडेला शेवटी हृदय रेषेवर फाटे फुटलेले असतील तर अश्या व्यक्ती प्रजोपादनात सक्षम समजल्या जातात. थोडक्यात विवाह रेषेच्या वर उभ्या सूक्ष रेषा, विवाह रेषा ठळक व सरळ व त्या खालीच हृदय रेषेला शेवटी करंगळीच्या बाजून, हृदय रेषेच्या समाप्तीच्या वेळेस खाली वर जाणारे फाटे असतील तर संतान होण्यास अडचण असत नाही.

4 नंबरच्या बाणाने दाखविलेली यव सदृश किंवा गव्हाच्या दाण्यासारखी साखळी झाली असेल तर मुलगा अपत्य नक्की होते, मात्र प्रमुखतः अशी साखळी अंगठ्याच्या कडेवर असलेली पुरुष्याच्या हातावर असली पाहिजे, तरी पण संतान योग् पाहण्यासाठी पती- पत्नीचे दोघांच्याही दोन्ही हातावरील रेषा व चिन्हे यांचे परीक्षण गरजेचे आहे

फोटोमधे बाणाने हृदय रेषेचा शेवट दाखविला आहे, या हृदय रेषेला शेवटी गायीच्या शेपटासारखे फाटे नसल्यामुळे या जातकाला अद्याप संतान नाही जातक आता 45 वर्षाचा आहे, सर्व औषधोपचार झाले परंतु संतान योग आला नाही. हातावर विवाह रेषा आहेत त्या मुळे जोडीदाराचे नैसर्गिक आकर्षण आहे, परंतु जातकाच्या शुक्राणू मध्ये गर्भ धारणेची क्षमता नाही. त्यासाठी विवाह रेषेच्या शेवटी खाली वर जाणारे छोटे फाटे किंवा रेषा असणे गरजेचे आहे नाहीतर संतान होण्यात निश्चित अडचणी येतात.

विवाह रेषेवर असलेल्या उभ्या रेषा ह्या दोन ते 7 इतक्या संख्येने असतात, म्हणून तितकी अपत्ये त्या व्यक्तीस होत नाहीत कारण व्यक्तीने गर्भधारणा होऊ नये म्हणून नियोजन केले तर जेव्हढ्या रेषा तेव्हडे आपत्य योग होऊ शकत नाही. विवाह रेषेवरील उभ्या सूक्ष्म बारीक रेषा ह्या मुलगी आपत्य दाखविते, तर जाड रेषा मुलगा आपत्य दर्शविते, निर्बली रेषा सुद्धा विवाह रेषेवर असतात त्या गर्भपात दाखवितात.

काही व्यक्तींच्या अंगठ्याच्या शेवटी आडव्या रेषेवर साखळी किंवा एखादे गव्हाच्या दाण्यासारखे चिन्ह असता मुलगा आपत्य होण्याचे ते सांकेत देतात, परंतु गर्भ धारणेचे नियमन केल्याने कदाचित आधी नशिबात असणारे मुलगा आपत्य होत नाही व मुलगी होते, तरी पण ज्यांचे अंगठ्याच्या शेवटी उभ्या असलेल्या रेषेवर साखळी असेल किंवा गव्हाच्या दाण्या सारखे एखादे चिन्ह असेल तर मुलगा अपत्य होण्याची दाट शक्यता असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या