Friday, April 26, 2024
Homeनगरअहमदनगर महापालिका : स्थायी समितीची गुरूवारी ऑफलाईन सभा

अहमदनगर महापालिका : स्थायी समितीची गुरूवारी ऑफलाईन सभा

अहमदनगर (प्रतिनिधी) –

करोना नियमावलीचा अवलंब करत महापालिका स्थायी समितीची सभा सभापती अविनाश

- Advertisement -

घुले यांनी बोलावली आहे. गुरूवारी (दि. 8) दुपारी एक वाजेच्या सुमारास स्थायी समिती सभागृहात ही सभा होत आहे.

जिल्हा न्यायालयाच्या इमारतीला दिलेल्या पाणीपट्टीतील शास्तीमाफी, जिजामाता आणि नेहरू उद्यान बीओटी तत्वावर देणे तसेच बुरूडगाव कचरा डेपोसदंर्भातील निविदा आणि पाणीपट्टी निर्लेखित करणे असे 22 विषय सभेसमोर ठेवण्यात आले आहेत. कै. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलच्या प्रसुतीगृहातील सोनोग्राफी क्रेंदाकरीता रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांची प्रती केस तत्वावर तीन वर्षाकरीता नेमकणूक करणे असे विषय सभेसमोर आहेत.

नागरी दलित वस्ती सुधारण योजनेंतर्गत गटार आणि रस्ते डांबरीकरणाचे विषयही समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. सुमारे चार कोटी रूपयांच्या निविदांचे विषय समितीच्या सभेत चर्चेला येणार आहेत.

दुसरी मात्र खर्‍या अर्थाने पहिली

सभापती पदी निवड झाल्यानंतर अविनाश घुले यांची पहिलीच अर्थसंकल्पीय सभा झाली. त्यानंतर आता ही दुसरी पण खर्‍या अर्थाने पहिली सभा होत आहे. घुले यांनी ही सभा ऑनलाईन न घेता ऑफलाईन बोलाविली आहे. सभेत मात्र कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन सभापती घुले यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या