Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमुहूर्त ठरलं! iPhone 12 लॉन्चिंगबाबत कंपनीकडून अधिकृत घोषणा

मुहूर्त ठरलं! iPhone 12 लॉन्चिंगबाबत कंपनीकडून अधिकृत घोषणा

युके (United Kingdom) :

अँँपल कंपनीने मोस्ट अवटेड सीरीज iPhone 12 लवकरच लॉन्च करू शकते. या महिन्यात दि. १३ ऑक्टोबर रोजी अँँपल आयफोन 12 लॉन्च करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

अँँपलच्या इनसायडर रिपोर्टनुसार, अँँपल इंटरनेट सॉफ्टवेअर अँड सर्विसचे सिनियर वाइस प्रेसिंडेंट अँँडी क्यू आगामी आयफोन आणि त्याच्या 5जी क्षमतेबाबत यूके कॅरियर प्रेझेंटेशनमध्ये बोलल्याचं सांगितलं जात आहे.

प्रेझेंटेशन दरम्यान ब्रिटिश टेलिकॉमचे सीईओ मार्क अल्लेरा यांनी प्रेझेंटेशन दरम्यान कर्मचाऱ्यांना सांगितलं की, “आपण अँँपलच्या पुढिल 5जी आयफोनपासून काही दिवसच लांब आहोत.

5जी इनोवेशनसाठी हा फोन मोठा बूस्ट असणार आहे. याला लॉन्च करण्यासाठी कंज्युमरने वर्षभरासाठी तयारी केली आहे. तसेच अँँपलचा युरोपमधील नंबर वन पार्टनर बनण्यासाठीही तयार आहे.”

- Advertisment -

ताज्या बातम्या