Friday, April 26, 2024
Homeधुळेधुळ्यात अधिकारीही धावलेत

धुळ्यात अधिकारीही धावलेत

धुळे Dhule । प्रतिनिधी

भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल (Bharat Ratna Sardar Vallabhbhai Patel) यांच्या जयंतीनिमित्त (Jayanti) आज धुळ्यात राष्ट्रीय एकता दौड (Rashtriya Ekta Daud)पार पडली. धुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, मनपा प्रशासन, धुळे जिल्हा पोलीस दल, एस.डी.आर.एफ, एस.आर.पी. एफ. बँड पथक, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विविध क्रीडा संघटना, विद्यार्थी, नागरिक व खेळाडू या राष्ट्रीय एकता दौड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

- Advertisement -

सुरुवातीस जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी टॉवर गार्डन येथील भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देऊन राष्ट्रीय एकता दौडला हिरवी झेंडी दाखवून रॅलीस प्रांरभ केला. या रॅलीस सरदार वल्लभभाई पटेल उद्यानापासून (टॉवर गार्डन) सुरु होऊन जमनालाल बजाज मार्ग, आग्रा रोड, महानगरपालिकेची जुनी इमारतमार्गे रॅलीचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात समारोप झाला.

या एकता दौड मध्ये जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, धुळे महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, उपविभागीय पोलीस अधिकारी सिंगा ऋषिकेश रेड्डी, ईश्वर कातकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, धुळे महापालिकेचे विजय सनेर, मनोज वाघ, थलेटिक्स संघटनेचे हेमंत भदाणे, योगेश वाघ, योगेश पाटील, 48 एनसीसी बटालियनचे विद्यार्थी, महसूल, पोलीस, जिल्हापरिषद, मनपाचे अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या