Friday, April 26, 2024
Homeनगर'या' कारणावरून 'त्याने' केला औषध प्रशासन कार्यालयावर दगड मारण्याचा केला प्रयत्न

‘या’ कारणावरून ‘त्याने’ केला औषध प्रशासन कार्यालयावर दगड मारण्याचा केला प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

औषध प्रशासनाच्या कारभाराविषयी लोकांमध्ये चिड निर्माण होत आहे. याचाच प्रत्यय बुधवारी आला.

- Advertisement -

करोना महामारीने रौद्र रूप धारण केले असताना औषध प्रशासन विभागाचे कार्यालय बंद असल्यामुळे व तेथील अधिकार्‍यांनी फोन न उचलल्यामुळे संतप्त झालेले संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ कराळे यांनी कार्यालयावर दगड मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी कराळे यांना ताब्यात घेऊन सोडून दिले.

सध्या नगरमध्ये करोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणार्‍या रेमडेसिवीर इंजेक्शनासह ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना चांगलीच पळापळ करावी लागत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन न मिळाल्याने सोमनाथ कराळे यांनी औषध प्रशासनाचे कार्यालय गाठले. याची पूर्व कल्पना तोफखाना पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहायक निरीक्षक किरण सुरसे पथकासह औषध प्रशासन कार्यालय येथे गेले.

आज सुट्टी असल्याने याठिकाणी कोणीही आले नाही. परंतु जिल्हाधिकारी कार्यालय येथे या कार्यालयाशी निगडित व्यक्ती उपस्थित आहे, असे पोलिसांनी कराळे यांना सांगितले. परंतु जे फोन नंबर प्रशासनाने जाहीर केले आहे त्यातील एकही अधिकारी फोन उचलत नसल्याचे त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून देत कार्यालयावर दगड फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या