Friday, April 26, 2024
Homeनगरधर्मगुरुंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संगमनेरात तणाव

धर्मगुरुंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संगमनेरात तणाव

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

एका धर्मगुरुच्याबद्दल सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने संगमनेरात तणाव निर्माण झाला आहे. एका समाजाच्या जमावाने शहर पोलीस ठाण्यात गर्दी करत संबंधितांवर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी करत ठिय्या दिला आहे. यामुळे संगमनेरात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर एका समाजाच्या धर्मगुरुबाबत वादग्रस्त पोस्ट आल्याने दिल्ली नाका येथे एका समाजाच्या लोकांनी गर्दी केली. त्यानंतर सदर जमाव पोलीस ठाण्यावर आला. ही माहिती तालुक्यात वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर तालुक्यातूनही काही लोक पोलीस ठाण्यात आले. तेथे आल्यानंतर जमावाने एकच घोषणाबाजी केली. आरोपींना अटक करा, तरच आम्ही येथून उठू, अशी मागणी त्यांनी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जादा पोलीस कुमक बोलविण्यात आली आहे. संगमनेर शहर व तालुका पोलीस अधिकारी व कर्मचारी हे पोलीस ठाण्यात हजर झाले.

जमावाला शांत करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून होत होता. मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानंतर सदर समाजाच्या काही व्यक्तींनी पोलीस प्रशासनास सांगितले की, आरोपींना अटक झाले नाही तर आम्ही येथून हटणार नाही, असा सूर लावला. त्यानंतर पोलीस अधिकार्‍यांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शविली. त्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्याचे कामकाज सुरु केले. मात्र जमाव पोलीस ठाण्यातच ठाण मांडून आहे. संगमनेरातील हा तणाव पाहता आजी माजी नगरसेवक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतांना देखील वातावरण काही शांत होत नाही. आम्हाला आरोपी समोर आणा, अशी मागणी सदर जमावाने केली. शहरात पोलीस बंदोबस्त विविध ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात आलेला जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

सदर सोशल मीडियावरील अकाऊंटला 17 व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना एका व्यक्तीने टॅग केले आहे. तेही नावे पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता पोलीस यावर काय कारवाई करतात? याकडे जमावाचे लक्ष लागले आहे. श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांनी गांभीर्य लक्षात घेऊन संगमनेरच्या दिशेने कूच केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या