Wednesday, April 24, 2024
Homeजळगावशासकीय कामात अडथळा : हलखेडा येथील एकावर गुन्हा दाखल

शासकीय कामात अडथळा : हलखेडा येथील एकावर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर Muktainagar

तालुक्यातील वडोदा (Vadodara)वनपरिक्षेत्रातील (Forest Range) शासकीय कामात (government work) अडथळा (Obstruction)आणून वनरक्षकास शिवीगाळ करून केल्याच्या कारणावरून येथील एका इसमाविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास नियत वनक्षेत्र वडोदा कंपार्टमेंट नंबर 561 मध्ये घडली.

- Advertisement -

याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनपरिक्षेत्र कार्यालयात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ज्ञानोबा मोहनराव धुळगंडे 51 वर्षे राहणार वनपरिक्षेत्र कार्यालय कुऱ्हा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी हा जंगली डुकरांना मारण्याकरिता ठेवलेले गोळे घेऊन परत येत असताना वन रक्षक ज्ञानोबा धुळगंडे यांनी हलखेडा येथील रहीम पवार या सांगितले की तुम्हाला वन्य प्राण्यांना मारण्याचा अधिकार नाही यामुळे वन्य प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो.

असे समजून सांगत असताना आरोपी ला राग आला व त्या कारणावरून त्याने फिर्यादीला त्यांचे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला व शिवीगाळ करून धक्काबुक्की करून जमिनीवर दगड उचलून फिर्यादीच्या डाव्या हातास मारून दुखापत केली सदर घटना आज सकाळी साडेआठ वाजता वडोदा वनक्षेत्र कंपार्टमेंट नंबर 561 मध्ये घडली.

यावरून फिर्यादी विरूद्ध भारतीय दंड संहिता कलम 353 332 337 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीमती परविन तडवी या करीत आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या