Saturday, April 27, 2024
Homeजळगावमहिलेला फोनवरुन अश्‍लिल शिवीगाळ, मुलीसह जीवे मारण्याची धमकी

महिलेला फोनवरुन अश्‍लिल शिवीगाळ, मुलीसह जीवे मारण्याची धमकी

जळगाव – Jalgaon

शहरातील गणेश कॉलनी परिसरातील रहिवासी महिलेला ऑगस्ट महिन्यापासून फोनवरुन अश्‍लिल शिवीगाळ करणार्‍या संदीप सुधाकर भवर रा.जाफ्रराबाद ता.भोकरदन जि.जालना याच्या विरोधात आज शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, गणेश कॉलनी परिसरातील एका कॉलनीत ५० वर्षीय महिला वास्तव्यास असून ती घरकाम करते. १४ ऑगस्ट २०२० पासून आजपावेतो तिला भोकरदन तालुक्यातील जाफ्रराबाद येथील संदीप सुधारकर भवर हा त्याच्या ९२७१३९२००० या मोबाईल क्रमांक वरुन वारंवार फोन करतो.

महिलेच्या तक्रारीवरुन संदीप सुधाकर भवर याच्या विरोधात जिल्हापेठ पोलिसात भादवि कलम २९४, ५०९, ५०४, ५०६, ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शरीफ शेख हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या