Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसुरगाणा नगरपंचायत प्रभाग चारसाठी हरकत दाखल

सुरगाणा नगरपंचायत प्रभाग चारसाठी हरकत दाखल

सुरगाणा । Surgana

सुरगाणा नगरपंचायत प्रभाग आरक्षण सोडत हरकतीच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक चार साठी नगरसेवक अकील पठाण यांची हरकत दाखल केली आहे.

- Advertisement -

अकील पठाण यांनी हरकत घेतली असून प्रभाग क्र. 4 ची अनुसूची जमाती स्त्री राखीव म्हणून काढलेली सोडत पूर्ण पाने बेकायदेशीर आहे कायदा 1965 चे तरतुदीनुसार परीत केलेल्या नियमांनच्या पूर्ण पणे विरूद्ध आहे असे त्यांनी म्हटले आहे. प्रभाग क्र. 4 मध्ये वास्तविक एक ही अनुसुुचित जमातीचा सदस्य मतदार नसताना देखील संबंधित जोडपत्र 6 नुसार सुरगाणा नगर पंचायतिच्या मुख्य अधिकार्‍याने या निवडणूकीकरिता प्रकाशित केलेल्या प्रभागाला अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या तक्त्यावर चुकीने प्रभाग क्र.4 मध्ये मतदार अनुसूचित जमातीचे दाखविण्यात आले आहे.

असे असून देखील संबंधित प्रभाग क्रमांक,4 मधील एकूण मतदारांची संख्या 371 असून सबंधित तक्त्यानुसार अनुसूचित जमाती यांची संख्या 17 इतकीच येते. संबंधित प्रभाग क्र. 4 हा कोणत्याही राखीव जागांसाठी गृहीत न धरता तो प्रभाग साधारण प्रवर्गासाठी सोडण्यात, यावा अशी तक्रार अकील पठाण यांनी हरकतीमध्ये केली आहे.

पेठ नगरपंचायतीसाठी सहा हरकती

पेठ नगरपंचायतीच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकीसाठी जिल्हा निवडणूक तथा जिल्हाधिकारी यांच्या अधिसुचनेनुसार आरक्षण व प्रभाग रचनेच्या दि .18 नोव्हेंबर रोजी काढलेल्या सोडती बाबत नागरीकांना त्या बाबत आक्षेप, हरकत आदी बाबत लेखी म्हणणे मांडण्याचा दि.26 नोव्हेंबर या कालावधीत एकूण 6 हरकती रहिवाश्यांकडून प्राप्त झाल्याची माहिती पेठ नगरपंचायत प्रशासनाने दिली आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या