Friday, April 26, 2024
Homeनाशिकनायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा..!

नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा..!

पालखेड मिरचीचे । Palkhed

मकरसंक्रातीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पतंगबाजीस सुरुवात झाली आहे. मात्र पतंगासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे दुचाकीचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्याचप्रमाणे पक्ष्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.

- Advertisement -

पालखेड मिरचीचे येथील महादेव कहाणे आपल्या दुचाकीवरून पिंपळगावकडे येत असताना निफाड रोड परिसरात हवेत तरंगणारा नायलॉन मांजा त्यांच्या नाकाला घासला गेल्याने गंभीर जखम झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वीदेखील नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत.

कायद्याने नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी असताना शहरात तरुणांकडे नायलॉन मांजा सर्रास दिसून येतो. नायलॉन मांजाची चोरी छुपे विक्री करणार्‍या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. तसेच शहरातील जुना आग्रारोड परिसरात घुबडाचा पंख नायलॉन मांजाच्या जाळ्यात अडकल्याने ते जखमी अवस्थेत लटकत होते. त्यावेळी बाळासाहेब घुगे व परेश सोनकुल या स्थानिक नागरिकांनी त्या घुबडाची सुखरूप सुटका करून त्याला जीवदान दिले.

पिंपळगाव शहरात नायलॉन मांजामुळे अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत. कायद्याने नायलॉन मांजा विक्रीस परवानगी नसताना शहरात असा मांजा येतो कुठून आणि तो विक्री कोण करतात याची चौकशी करून अशा विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाईची गरज असल्याचे प्राणी-पक्षीप्रेमी व नागरिकांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या