Thursday, April 25, 2024
Homeनगरपोषण आहार अनुदान रक्कम, अन्न शिजविण्याच्या दरात वाढ

पोषण आहार अनुदान रक्कम, अन्न शिजविण्याच्या दरात वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शालेय पोषण आहार योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना हे नाव दिल्यानंतर आता शालेय पोषण आहारासाठीच्या अनुदानाच्या रक्कमेतही वाढ करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरात 9.6 टक्के दरवाढ मंजूर केली आहे. प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत (पूर्वीची शालेय पोषण आहार) 2020-21 या आर्थिक वर्षापासून अन्न शिजविण्याच्या दरात 10.99 टक्के वाढ करण्याचे आदेश केंद्र सरकारने 14 एप्रिल 2020 रोजी दिले होते.

- Advertisement -

त्यानुसार 24 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयाद्वारे अन्न शिजविण्याच्या दरासाठी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी (प्रति विद्यार्थी प्रतिदिन) 4 रुपये 97 पैसे आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी 7 रुपये 45 पैसे निश्चित केली आहे. परंतु, आता केंद्राच्या 7 ऑक्टोबर 2022 च्या आदेशानुसार 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता 1 ऑक्टोबर 2022 पासून अन्न शिजविण्याच्या दरात 9.6 टक्के दरवाढ मंजूर केली आहे. त्यानुसार, प्रति विद्यार्थी प्रतिदिन याकरिता प्राथमिक वर्गासाठी 5 रुपये 45 पैसे आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी 8 रुपये 17 पैसे हा सुधारित दर ठरविण्यात आला आहे.

अनुदानात दरवाढ – 9.6 टक्के (2022-23 आर्थिक वर्ष) – 1 ऑक्टोबर 2022 पासून दरवाढ. 10.99 टक्के (2020-21 आर्थिक वर्ष)

- Advertisment -

ताज्या बातम्या