Saturday, April 27, 2024
Homeधुळेप्रलंबित मागण्यांसाठी परिचारिका संघटना आक्रमक

प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिका संघटना आक्रमक

धुळे | प्रतिनिधी Dhule

प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले. आजपासून दोन दिवस दोन तास कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दि.२३ व २४ रोजी पुर्णवेळ संप असून यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास २५ पासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. कोविड काळात देखील मोठ्या धैर्याने काम करणार्‍या परिचारिकांना शासनातर्फे फक्त आश्वासने देण्यात आली.

प्रशासनाने परिचारिकांच्या कुठल्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे संतप्त परिचारिकांनी अखेर आजपासून संपूर्ण राज्यामध्ये प्रशासनाच्या विरोधामध्ये काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यावेळी संघटनेतर्फे सर्व परिचारिकांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली.

लवकरात लवकर शासनाने परिचारिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्या परिचारिकांनी केली आहे. आंदोलनात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित वसावे, पूनम पाटील, राहुल सोनवणे, शशिकांत सोनवणे, व्हिक्टोरिया पाथरे, हेमंत देवरे, अक्षय माळी, गणेश शेटे आदींनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या