Tuesday, April 23, 2024
Homeजळगावटंचाइग्रस्त गावांच्या संख्येत होणार घट

टंचाइग्रस्त गावांच्या संख्येत होणार घट

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

सलग दोन वर्षांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 3 मेाठे 96 मध्यम आणि लघू प्रकल्पांपैकी

जिल्हयात 15 तालुक्यात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे 176 निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून भूजल पातळीचे निरीक्षण वाचन वर्षातून जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेबर असे वर्षातून चार वेळा नोंदी घेतल्या जातात. यावर्षी सप्टेबर अखेर घेण्यात आलेल्या भूजल पातळीच्या नोंदीचा आणि मागील 5 वर्षाच्या ऑक्टोबर महिन्याच्या भूजल पातळीच्या सरासरीशी तुलनात्मक अभ्यास केला असता, जिल्ह्यातील तालुक्यांच्या निरीक्षण विहिरीच्या भूजल पातळीत सरासरी दिड ते दोन मीटरने वाढ झाली आहे.

- Advertisement -

डॉ. अनुपमा पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक, जळगाव

भोकरबारी 67.89, गुळ 88.12आणि अंजनी 99.11 टक्के वगळता सर्वच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत, परीणामी सर्वच तालुक्यात भूजल पातळीत मोठी वाढ झाली आहे,

त्यामुळे गतवर्षाप्रमाणे यावर्षी देखिल टंचाइग्रस्त गावांची संख्या कमी होण्याची चिन्हे असून जिल्हयातील भूजल पातळीत सरासरी दिड ते दोन मिटरने वाढ झाली असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

गिरणा, हतनूर, वाघूर असे 3 मोठया प्रकल्पांसह मध्यम लघू असे एकूण 96 पाणलोट क्षेत्र असून, गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला.

पावसाळयाच्या दिवसांत गतवर्षीच्या तुलनेत भूजल पातळी वाढ झाली आहे तसेच या पावसामुळे शेतातील ओल कायम राहिल्याने खरिपाच्या सिंचनासाठी विहिरीद्वारे उपसा झाला नाही आणि यावर्षी दोन पावसातील खंड झालेला नाही.

176 विहिरींव्दारे चार वेळा होते सर्वेक्षण

जिल्हयातील 15 तालुक्यात सर्वात जास्त जामनेर तालुक्यात 24 तर त्याखालोखाल चाळीसगांव 21, पारोळा 16, जळगाव 15, पाचोरा14, चोपडा 14, अमळनेर 13, मुक्ताईनगर 11, रावेर10, भुसावळ 7, बोदवड 6, यावल, धरणगाव 7, भडगांव 8 असे एकूण 176 निरीक्षण विहिरींच्या भूजल पातळीत 0.54 ते 3.19 मी. ने वाढ झालेली दिसून आल्याचे नोंदीत म्हटले आहे. जिल्हयात 15 तालुक्यातील निर्धारीत केलेल्या 176 विहिरींव्दारे वर्षभरात जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेबर असे चार वेळा भुजल पातळीचे सर्वेक्षण करण्यात येते.

कोरोना लॉकडाउन काळात औद्योगीक कंपन्याचा पाणीउपसा बंद असल्याने बहुतांश मोठया प्रकल्पात पाणीसाठी बर्‍यापैकी होता. त्यामुळे देखिल नदीपात्रात आणि बहुतांश परीसरात विहिरींची पाणीपातळी बर्‍यापैकी होती.

शिवाय मुबलक पावसामुळे खरिप हंगामात देखिल पाण्याचा उपसा कमी प्रमाणात झालेला आहे. यामुळे भूजल पातळीमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. असे असले तरी, सन 2017 च्या भूजल मूल्यांकनानुसार जिल्ह्यातील तीनही पाणलोटक्षेत्रात भूजलाचा उपसा पुनर्भरणाच्या तुलनेत सरासरी 70 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

मोठया आणि लघू मध्यम पाणलोट क्षेत्रात सूक्ष्म सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापराने अमाप होणार्‍या उपस्यावर नियंत्रण आणणे आदी कारणांमुळे भूजल पातळीत वाढ होण शक्य असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या