Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशUPI पेमेंट्सवरील शुल्काबाबत NPCI चा मोठा खुलासा

UPI पेमेंट्सवरील शुल्काबाबत NPCI चा मोठा खुलासा

दिल्ली । Delhi

केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांवर जोर दिल्यापासून नागरिकांकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे व्यवहार वाढले आहेत. अनेक खासगी बँकांनी UPI द्वारे व्यवहार करण्याची सुविधा सुरू केली आहे. पण

- Advertisement -

आजपर्यंत मोफत असलेले UPI व्यवहारांवर नव्या वर्षापासून शुल्क आकारले जाणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी सर्वत्र पसरले होते. या प्रकरणी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे.

NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, ०१ जानेवारी २०२१ पासून UPI च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. चुकीच्या आणि खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये. सोप्या पद्धतीने UPI व्यवहार सुरू ठेवा, असे आवाहन NPCI कडून यावेळी करण्यात आले. या स्पष्टीकरणानंतर UPI द्वारे व्यवहार करणाऱ्या कोट्यवधी युझर्सना दिलासा मिळाला असून, या विनामूल्य सेवेचा वापर करता येणार आहे.

दरम्यान, डिजिटल व्यवहारांकडे वाढलेला कल पाहता अनेक बँकांनी UPI द्वारे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, नववर्षापासून UPI च्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याचे वृत्त होते. सोशल मीडियावरही अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. यानुसार, आगामी वर्षापासून एका महिन्यात UPI द्वारे २० पेक्षा अधिक व्यवहार केल्यास प्रत्येक व्यवहारावर २.५ रुपये आणि ५ रुपये शुल्क द्यावे लागतील, असे या व्हायरल वृत्तात सांगितले जात होते. मात्र, UPI च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासंदर्भातील वृत्त खोटे आहे, असे NPCI कडून जाहीर करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या