Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाटेनिसपटू 'नोव्हाक जोकोविच'चा व्हिजा ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्यांदा रद्द, नेमकं कारण काय?

टेनिसपटू ‘नोव्हाक जोकोविच’चा व्हिजा ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्यांदा रद्द, नेमकं कारण काय?

दिल्ली | Delhi

टेनिसस्टार आणि जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन सरकारने धक्का दिला आहे.

- Advertisement -

नोव्हाक जोकोविचनं करोना प्रतिबंध लस घेतलेली नाही. ज्यामुळं समुदायाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असं मत मांडत ऑस्ट्रेलियाचं इमिग्रेशन मंत्री अॅलेक्स हॉल यांनी जोकोविचचा व्हिसा रद्द केलाय.

दुसऱ्यांदा व्हिसा रद्द झाल्याने जोकोविचच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याच्या आशा संपल्या आहेत. ही स्पर्धा ९ जानेवारीपासून सुरू झाली असून ती ३० जानेवारीपर्यंत चालणार आहे.

जोकोविचला थेट स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान देण्यात आले होते. त्याला या स्पर्धेत २१वे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी होती. मात्र, ऑस्ट्रेलियन सरकार जोकोविचला तत्काळ देशाबाहेर पाठवणार की त्याला येथे राहण्याची संधी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयाला जोकोविच पुन्हा कायदेशीर आव्हान देऊ शकतो. त्याला एखाद्या देशात वास्तव्य करण्याचा अधिकार आहे असा युक्तीवाद त्याच्याकडून केला जाऊ शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या