Monday, April 29, 2024
Homeनाशिकसराईत 'गटर्‍या' च्या आवळल्या मुसक्या

सराईत ‘गटर्‍या’ च्या आवळल्या मुसक्या

नाशिक | प्रतिनिधी

शहरातील कुख्यात गुन्हेगार गटर्‍या याच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिस गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास यश आले आहे. त्याच्याकडून तीन मोटारसायकली, दोन मोबाइल, कटावणी असा एकूण १ लाख ६१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

- Advertisement -

सुनील उर्फ गटर्‍या नागु गायकवाड (रा. सिदार्थनगर, कॉलेजरोड) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी अनिल कांबळे व त्यांच्या मित्रास कोयत्याचा धाक दाखवत, दमदाटी करत दोन मोबाइल व साडेपाचशे रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतल्याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात सुनील उर्फ गटर्‍या याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गायकवाड विरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याने पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय यांनी त्यास जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो पोलिसांच्या हाती येत नव्हता. शनिवार (दि. २८) रोजी सुनील गायकवाड हा नवनाथनगर, पेठरोड येथे येणार असल्याची माहिती गुन्हेशाखा युनिट एकचे हवालदार प्रवीण कोकाटे यांना मिळाली.

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, उपायुक्त संग्रामसिंह निशानदार, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरिक्षक महेश कुलकर्णी, अंमलदार प्रवीण कोकाटे, प्रवीण वाघमारे, शांताराम महाले, विशाल काठे, महेश सांळुखे, योगीराज गायकवाड, मुख्तार शेख, राम बर्डे यांच्या पथकानेे नवनाथ नगर येथे सापळा रचत गायकवाडला अटक करण्यात आली.

या गुन्ह्यांची कबुली, मुद्देमाल

तिबेटीयन मार्केट परिसरात घरफोडी करून रोख रक्कम व मोटारसायकल चोरणे तसेच वावी (ता. सिन्नर) पोलीस ठाणेअंतर्गत येणार्‍या खंबाळे येथे सागर खंडू कुवर यांची झोपडी आठ दिवसांपुर्वी जाळल्याची कबुली गटर्‍याने दिली आहे. यावेळी त्यांच्याकडून मोटारसायकल क्र. (एमएच १७, एएक्स ४२१८), ११ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाइल, १०० रुपये किंमतीची कटावणी, मोटारसायकल क्र. (एमएच १७ बीएच ९३४८) व कसारा येथून चोरी केलेली ऍक्टीव्हा क्र. (एमएच ०४ एफएल ५७००) असा एकूण १ लाख ६१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या