Friday, April 26, 2024
Homeनाशिकअकरा हजार सधन शेतकर्‍यांंना नोटिसा

अकरा हजार सधन शेतकर्‍यांंना नोटिसा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आर्थिकदृष्टया सबळ असतानाही केंद्र सरकारने लागू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे अनुदानाचा लाभ घेतल्याप्रकरणी जिल्ह्यातील दहा हजार ८४९ शेतकर्‍यांना जिल्हा प्रशासनाने नोटिसा धाडल्या आहेत.

- Advertisement -

हे सर्व शेतकरी प्राप्तिकर भरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व शेतकर्‍यांनी घेतलेले अनुदान त्यांच्याकडून वसूल केले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा या योजनेचे नोडल आॅफिसर भागवत डोईफोडे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकिपुर्वी पंतप्रधान मोदी यांनी अल्प भूधारक शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरु केली होती. दोन एकर जमीन असणार्‍या शेतकर्‍यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपयांचे अनुदान तीन टप्प्यात जमा केले जाते. दुसर्‍यांदा निवडून आल्यावर मोदी यांनी अल्प भुधारक ही अट शिथिल करत सरसकट शेतकर्‍यांना हे अनुदान सुरु केले.

त्यासाठी बॅक खाते, आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या सबळ व प्राप्तिकर भरणार्‍या शेतकर्‍यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. यायोजनेला दोन वर्ष पूर्ण होत असून केंद्र सरकारने या योजनेचे आॅडिट केले. त्यात प्राप्तिकर भरणारे शेतकरिही या योजनेचे अनुदान घेत असल्याचे समोर आले.

त्यानंतर केंद्र सरकारने अशा लाभ घेणार्‍या देशभरातील शेतकर्‍यांना नोटिसा धाडल्या अाहेत. नाशिक जिल्ह्यात प्राप्तिकर भरणारे जवळपास ११ हजार शेतकरी अनुदान लाटणार्‍या शेतकर्‍यांना नोटिसा धाडल्या आहेत. या सर्व शेतकर्‍यांकडून अनुदान वसूल केले जाणार आहे.

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचे आॅडिट केले असून प्राप्तिकर भरणारे शेतकरी अनुदान घेत असल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यात या प्रकरणी ११ हजार शेतकर्‍यांना नोटिसा पाठविल्या असून त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाणार आहे.

– भागवत डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या