Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशकातील नऊ खासगी रुग्णालयांना मनपाकडून नोटीसा

नाशकातील नऊ खासगी रुग्णालयांना मनपाकडून नोटीसा

नाशिक । Nashik

महापालिका प्रशासनाने शहरातील नऊ खाजगी रुग्णालयांना नोटीसा बजावले असून त्यांच्याकडून मृत्यू झालेल्या रुग बाबत खुलासा मागवला आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

video नाशिक, नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये करोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अन्य रुग्णालयांच्या तुलनेत अधिक आढळले आहे. त्यामुळे महापालिकेने मृत्यू दर अधिक असलेल्या नऊ खासगी रुग्णालयांना नोटीसा बजावल्या असून त्यांच्याकडून मृत्यूच्या कारणांचा खुलासा मागविला आहे. करोना बळींचे प्रशासकीय ऑडीट करण्याचा निर्णय आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला आहे.

नाशिक शहरातील वाढत्या रुग्णसंख्या बरोबरच मृत्यूंची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माहिती मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नाशिक शहरातील मृत्यू संख्येचा वाढता आलेख चिंताजनक आहे.

त्याव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या अधिक असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नऊ रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.1 मार्च ते 14 मे 2021 या काळातील करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त का आहे? मृत्यूदर जास्त असणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याने संबंधित रुग्णालयांनी ई-मेलद्वारे खूलासा करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल, वोक्हार्ट हॅस्पिटल, सिक्ससिग्मा हॉस्पिटल, देवळाली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, देवळाली कॅम्प, सनसाईस हॉस्पिटल, श्री सिध्दी विनायक हॉस्पिटल, नाशिक रुग्णालय नाशिक, त्रिमुर्ती हॉस्पिटल आणि गंगापूर रोडवरील श्रीगुरुजी रुग्णालयाला महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या