Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनोटप्रेस राहणार बंद, हे आहे कारण

नोटप्रेस राहणार बंद, हे आहे कारण

नाशिकरोड | Nashik road

येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस बंद राहणार आहे. यापुर्वी दोन दिवस प्रेस बंद होती. आता पुन्हा यामुळे…

- Advertisement -

प्रेस बंद राहणार आहे. करोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस या दि. ३० ऑगस्ट पासून गुरुवार दि.०३ सप्टेंबर पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.

करोना मुळे गेल्या काही दिवसापासून दोन्ही प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांना करोनाची लागण झाली आहे. परिणामी भविष्यकाळात आणखी प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दोन्ही प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

यापूर्वी लॉकडाउनच्या काळात तब्बल दोन महिन्यांहून अधिक दोन्ही प्रेसचे कामकाज बंद होते. आता पुन्हा प्रेसचे कामकाज पाच दिवस बंद राहणार आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या