Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याAjit Pawar: मुख्यमंत्रीपदासाठी २०२४ला नाही,मी आत्ताच मुख्यमंत्री होणार..

Ajit Pawar: मुख्यमंत्रीपदासाठी २०२४ला नाही,मी आत्ताच मुख्यमंत्री होणार..

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अजित पवार भाजप सोबत जाणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र त्याला अजित पवार यांनी पूर्णविराम दिला. मात्र आज आणखी एक सूचक विधान करून अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना बळ दिलं आहे.

- Advertisement -

२०२४ ला नाही तर मी आताच मुख्यमंत्री होणार आहे, असं सूचक वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar’s indicative statement) यांनी केलं आहे. एका मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. त्या मुलाखती दरम्यान अजित पवारांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे. दरम्यान अजित पवारांनी हे वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला होता.

नाशिक कृउबा निवडणूक : पिंगळे विरुद्ध पिंगळे, चुंभळेंचेही आव्हान; जिल्ह्याचे लक्ष लागूनखारघरमधील दुर्घटनेबद्दल काय म्हणाले शरद पवार…वाचा सविस्तर

‘मी आता देखिल राज्याच मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. मी पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे ह्या दोन्ही माजी मुख्यमत्र्यांसोबत काम केलं. दोघांनाही आमदारकी पदाचा अजिबात अनुभव नव्हता तरीही आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आम्ही आनंदाने काम केलं. पृथ्वीराज चव्हाण सोबत आमच्या पक्षातील वरिष्ठांनी सागितलं म्हणून काम केलं, असंही पवार म्हणाले.

यंदाची ‘मन की बात’ राहाणार विशेष.. काय आहे कारण? वाचा सविस्तर

यावेळी अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपदाचं इतकं आकर्षण का? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचं अजिबात आकर्षण नाही, २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळेल एवढी संख्या मतदारांनी दिली होती. राजकीय जीवनात काम करताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. त्यामुळे ते सांगतील ते ऐकावं लागतं”. असं ही अजित पवार म्हणाले.

माझा आजचा कार्यक्रम पूर्वनियोजितच होता. शरद पवार सुद्धा तिथे आहे. पण हा कार्यक्रम अडीच महिन्यांपूर्वीच ठरला होता. त्यामुळे मी इथं आलोय. त्यामुळेच मी मुंबईच्या पक्षाच्या शिबिराला हजर राहू शकलो नाही. पण मीडियातून उगीच संभ्रम निर्माण केला जातो. मला या कार्यक्रमामुळे तिथे जाता आलं नाही, असा खुलासाही पवारांनी केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या