Tuesday, April 23, 2024
Homeजळगावउत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षांना प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षांना प्रारंभ

जळगाव jalgaon (प्रतिनिधी)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) पीएच.डी. प्रवेशपूर्व (Ph.D. Pre-admission) (पेट) परीक्षांना (exams) आज सोमवार दि.१८ एप्रिल पासून सुरळीत प्रारंभ (Start) झाला. पहिल्या दिवशी ८१८ विद्यार्थ्यांपैकी ५३५ विद्यार्थ्यांनी पेटची ऑनलाईन परीक्षा दिली.

- Advertisement -

दिनांक १८ ते २२ एप्रिल पर्यंत विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा केंद्रात (online examination center) या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. एकुण ३ हजार ६८८ विद्यार्थी (Student) या परीक्षेसाठी बसले आहेत. यासर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जात असून त्यासाठी २५० संगणकांची (computers) व्यवस्था करण्यात आली आहे. एका दिवसात ४ बॅचेसमध्ये या परीक्षा होत आहेत.

सोमवार दि.१८ एप्रिल रोजी या परीक्षा केंद्राला कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी (Vice Chancellor V.L. Maheshwari) यांनी भेट देऊन पाहणी केली. परीक्षा सुरळीत सुरु असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या समवेत प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे (In-charge Vice-Chancellor Prof. S.T Ingle) उपस्थित होते. दिवसभरात चार बॅचेससाठी ८१८ विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी ५३५ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.

पहिल्या दिवशी वनस्पतीशास्त्र, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणीशास्त्र आणि मानसशास्त्र या सहा विषयांच्या परीक्षा झाल्या. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या परीक्षेच्या व्यवस्थेबद्दल समाधान असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.

केंद्रप्रमुख (Kendrapramukh) म्हणून प्रा. पी.पी.माहुलीकर (Prof. P.P. Mahulikar) हे काम पहात असून मुख्य समन्वयक प्रा.समीर नारखेडे तर समन्वयक डॉ.मनोज पाटील आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून सहायक कुलसचिव व्ही.व्ही. तळेले आणि तांत्रिक अधिकारी म्हणून दाऊदी हुसेन काम पहात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या