कार्यकर्त्यांच्या उमेदीतूनच काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार

jalgaon-digital
3 Min Read

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद आणि जोश घेऊन पक्ष संघटन करीत आहे. कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील रिक्त पदे भरुन संटनात्मक बांधणी करण्यात येणार असून काँग्रेसला पुन्हा बालेकिल्ला करणार असल्याची ग्वाही सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील , डॉ.उल्हास पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार प्रणिती शिंदे पुढे म्हल्या की, काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्राची कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी माझ्याकडे असून उत्तर महाराष्टात नाशिक, मालेगाव येथील बैठका घेतल्यानंतर आज जळगावात काँग्रेस पदाधिकार्‍यांचा मेळावा घेण्यात येणार होता.

मात्र, कोविडच्या नियमाचे पोटोकॉल लक्षात घेऊन मेळाव्याऐवजी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी वैयक्तीक संवाद साधण्यात आला.

काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, काँग्रेस सेवादल अध्यक्ष, महिला काँग्रेस अध्यक्ष,एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व फ्रंटलचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून एका आठवड्याभरात काँग्रेसच्या रिक्त पदांबाबत निर्णय घेऊन कोरम पूर्ण करण्यात येईल.

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत दुफळी पाहण्यास मिळते, यावर आमदार शिंदे म्हणाल्या की, कार्यकर्त्यांशी आताच संवाद साधण्यात आला असून जळगाव जिल्ह्यातील आमदार शिरीष चौधरी यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांमध्ये चांगला समन्वय आहे. त्यांनी मेळाव्याच्या दृष्टीने उत्तम नियोजन केले होते. यावरुन काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना नवी उर्जा देण्यासाठी आणि पक्षसंघटन मजबूत करणे गरजेचे असल्याने काँग्रेस पदाधिकार्‍यांची भेटीतून संवाद साधला. काँग्रेस महानगराध्यक्षसह रिक्त पदे भरण्यात येईल. नवी जोश घेऊन काँग्रेसला बळकटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षासोबत माझी भूमिका

मराठा समाज आरक्षणासंदर्भात आपली काय भूमिका असा प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांना विचारला असता, काँग्रेस पक्षाची जी भूमिका राहील. तीच माझी भूमिका राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एमडीएल लॅबसह ऑक्सिजन टँकचे लोकार्पण

गेल्या वर्षभरात डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयाच्या माध्यमातून काँग्रेस पदाधिकारी देत असलेल्या सेवेचा आढावा व एमडीएल लॅब आणि ऑक्सीजन टँकची उपलब्धता यातून तळागाळात आजही काँग्रेस आपली कार्य करण्याची संस्कृती जोपासल्याचा आनंद होत आहे, असे प्रतिपादन आमदार प्रणितीताई शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांच्याहस्ते आज डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एनएबीएल मानांकित एमडीएल लॅबसह 13 किलोलिटर क्षमतेच्या दोन ऑक्सीजन टँकचे लोकार्पण करण्यात आले, याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी होते.

प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीपा पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, महिला अध्यक्ष सुलोचना वाघ, डॉ.केतकी पाटील, धनंजय चौधरी, उत्तर महाराष्ट्रचे बंटीभैय्या आदींची उपस्थितीती लाभली. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे सदस्य डॉ.वैभव पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, डॉ.प्रशांत वारके, एन.जी.चौधरी, प्रविण कोल्हे आदिंसह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *