Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशआता हसण्यावर बंदी, मद्यपान केल्यावर शिक्षा

आता हसण्यावर बंदी, मद्यपान केल्यावर शिक्षा

हसणे हे आरोग्यासाठी सर्वोत्तम औषध मानले जाते. हसण्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असतात. वैद्यकीय शास्त्रानुसार, हसताना आपल्या शरीरात विषाणूविरोधी पेशी वेगाने तयार होतात आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे हास्य क्लबही सुरु झाले आहे. परंतु आता हसण्यावरच बंदी आणली आहे.

रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

- Advertisement -

उत्तर कोरियात (North Korea)हसण्यावर बंदी (banned)आणण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong-un) यांनी घेतलेला हा निर्णय चर्चेचा विषय ठरत असते. त्यांनी उत्तर कोरियात (North Korea)आता पुढील ११ दिवस नागरिकांवर हसण्यावरच बंदी घातली आहे. देशाचे माजी नेते आणि सध्याचा हुकूमशाह किम जोंग उन याचे वडील किम जोंग-इल (Kim Jong-il) यांच्या १० व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सरकारनं लोकांच्या हसण्यावर बंदी घातली आहे.

देशातील नागरिकांनी जर कोणत्याही पद्धतीचं सेलिब्रेशन किंवा हसताना दिसले तर त्यांच्याकवर कडक कारवाई केली जाणार आहे. किम जोंग-इल यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ११ दिवस देशातील नागरिकांवर कोणत्याही पद्धतीचं सेलिब्रेशन, सण किंवा आनंद साजरा करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. इतकंच नव्हे, तर नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू दिसता कामा नये असं फर्मान किम जोंग उन यानं काढलं आहे. ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू दिसेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आदेश किम जोंग यानं दिले आहेत.

Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

मद्यमान करण्यावरही बंदी

राष्ट्रीय शोक असलेल्या काळात जर कुणी मद्यमान केलं किंवा कोणत्याही पद्धतीचा नशा करताना दिसलं तर तो व्यक्ती आजवर परत आलेला नाही अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. याशिवाय या काळात वाढदिवस, सेलिब्रेशन किंवा कोणत्याही पद्धतीचे सोहळे साजरे करण्याची परवानगी नाही. आदेशाचं उल्लंघन झाल्यास संबंधितांना अटक करण्यात येते आणि कठोर शिक्षा सुनावण्यात येते असं सांगितलं जातं.

- Advertisment -

ताज्या बातम्या