Friday, April 26, 2024
Homeनगरमुख्य रस्त्यांवरील अडचणी सोडविण्यासाठी मर्चंटने मदत करावी- नोपाणी

मुख्य रस्त्यांवरील अडचणी सोडविण्यासाठी मर्चंटने मदत करावी- नोपाणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी व्यापार्‍यांनी आपल्या दुकानात असलेल्या कॅमेर्‍याची एक बाजू रस्त्याच्या बाजूने लावावी.

- Advertisement -

तसेच दहा ते बारा दुकानदारांनी एक वॉचमन नियुक्त करावा. याची पोलिसांना मोठी मदत होऊन शहरातील गुन्हेगारी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी व्यापारी मर्चंटने मदत करावी, असे प्रतिपादन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक आयपीएस अधिकारी आयुष नोपानी यांनी केले.

श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन आयोजित चर्चासत्रात त्यांनी माहिती दिली. यावेळी मर्चंटचे अध्यक्ष विशाल फोपळे, उमेश आगरवाल, अमोल कोलते, आदी उपस्थित होते. श्रीरामपूर शहरात वाहतूक शाखेचा झालेला बोजवारा, वाढती गुन्हेगारी, रस्त्यावर उभ्या राहणार्‍या हातगाड्या, पोलीस स्टेशनमध्ये व्यापार्‍यांना येणार्‍या अडचणी याबाबत तक्रारी मांडल्या. या चर्चासत्रात रमण मुथ्था, सुनील गुप्ता, वैभव लोढा, गौतम उपाध्ये, नगरसेवक किरण लुणिया आदींनी या चर्चेत सहभाग नोंदवला.

आयुष नोपाणी म्हणाले, शहरातील अतिक्रमण, छोट्या व्यावसायिकांच्या हातगाड्या लावणे, वाहने अस्ताव्यस्त लावणे यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी कोणाची जबाबदारी आहे हे पहाण्यासाठी पालिका, वाहतूक शाखा यांच्याबरोबर बैठक घेऊन ही अडचण सोडविणार असल्याचे सांगितले. करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी मास्क वापरा, सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करा.

गुन्हेगारी कमी करण्यासाठी व्यापार्‍यांनी आपल्या दुकानात असलेला कॅमेर्‍याची एक बाजू रस्त्याच्या बाजूने लावावी. तसेच दहा ते बारा दुकानदारांनी एक वॉचमन नियुक्त करावा. याची पोलिसांना मोठी मदत होऊन शहरातील गुन्हेगारी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चासत्रात सगळ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देवून अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी व्यापारी असोसिएशनच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष विशाल फोफळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, तिलक डुंगरवाल, नागेश सावंत, अनिल पांडे, प्रितेश कुंकूलोळ, यांनी मनोगत व्यक्त केले. परिचय उपाध्यक्ष उमेश अग्रवाल, स्वागत निलेश ओझा, सूत्रसंचलन नितीन ललवाणी यांनी केले. अमोल कोलते यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या