Saturday, April 27, 2024
Homeनगरनॉनटिचिंग मतदारसंघ रद्द करा

नॉनटिचिंग मतदारसंघ रद्द करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या मतदारसंघात असणारा नॉनटिचिंग मतदारसंघ रद्द करणे गरजेचे झालेले आहे. या मतदारसंघातून गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी हे निवडणूक लढवतात आणि शिक्षक मतदारांवर दबावाचे राजकारण करतात. यामुळे या मतदारसंघातील अन्य घटक असणार्‍या नगर पालिका, महानगर पालिका आणि भिंगार छावणी परिषदेच्या शिक्षकांवर अन्याय होतो, असा आरोप शिक्षक नेते मच्छिंद्र लोखंडे यांनी केला आहे. यामुळे नॉनटिचींग मतदारसंघ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

सोमवारी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा निकाल जाहीर झाला आहे. यात एका शिक्षण विस्तार अधिकारी यांचा आर्श्चयकारक विजय झाला आहे. संबंधीत विस्तार अधिकारी ज्या मंडळातून उभा होता, त्या मंडळाच्या नेत्यासह अख्खे मंडळ निवडणुकीत पराभूत झाले आहे. मात्र, निवडून आलेल्या विस्तार अधिकारी यांच्या पूर्वीचे कार्यक्षेत्र आणि सध्याचे निवसाच्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात एकट्याला मतदान झाले. संबंधीत विस्तार अधिकारी उभ्या असणार्‍या अन्य उमेदवारांना शिक्षकांनी मतदान न करता एकट्या विस्तार अधिकारी यांना कसे मतदान केले हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.

यातून विस्तार अधिकारी यांचा शिक्षक मतदारांवर दबाब असल्याचे सिध्द होत आहे. तसेच विस्तार अधिकारी यांच्या विरोधात उमेदवारी करणार्‍या आणि पराभूत झालेल्या नगर पालिका कार्यक्षेत्रातील उमेदवारांचे अख्खे मंडळ एक हजारांपेक्षा अधिक मताने विजय होत असून संबंधीत उमेदवार पडतो, हे दुर्दैवी आहे. यामुळे शिक्षक बँकेने सर्वसाधारण सभेत ठराव करून अथवा बँकेच्या बायलॉजमध्ये बदल करून यापुढे अधिकारी यांना नॉनटीचींग मतदारसंघ रद्द करावा, अथवा अधिकार्‍यांना शिक्षक बँकेसाठी उमेदवारी देवू नयेत, अशी मागणी लोखंडे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या