Wednesday, April 24, 2024
Homeनगरनॉन कोविड आरोग्य सुविधांमध्ये नगर राज्यात अव्वल

नॉन कोविड आरोग्य सुविधांमध्ये नगर राज्यात अव्वल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने पुरविण्यात येणार्‍या माता बाल संगोपण कामे, प्रसृती, प्रसृती पूर्व आणि नंतर दिल्या जाणार्‍या सेवा, विविध लसीकरण या कामांचे दर महिन्यांला राज्यातील प्रत्येक जिल्हानिहाय राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने मानांकनानूसार रॅकिंग करण्यात येते. एप्रिल महिन्यांच्या या रॅकिंगमध्ये नगर जिल्हा राज्यात पहिल्या स्थानावर आहे. कोविडच्या दुसर्‍या लाटेतही जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ही कामगिरी केलेली आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या 96 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 555 उपकेेंद्रात अखंडपणे माता बाल संगोपन काम, प्रसृती, प्रसृती पूर्व आणि नंतरचे लसीकरण, गरोदर मातांचे विविध लसीकरण, कुटूंब कल्याण कार्यक्रम, महिला व पुरूष नसबंदी, दुर्बीणीव्दारे कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया, पोलीओ लसीकरण, बीसीजीचे लसीकरण, पॅन्टावेलंट लसीकरण यासह अन्य आरोग्य विषयक सेवा देण्यात येतात.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय आरोग्य सेवेवर प्रचंड ताण असतांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने करोना तपासणीसोबतच नॉन कोविड असणार्‍या या कामामध्ये खंड पडून दिलेला नाही. दरवर्षी एप्रिल ते मार्च या 12 महिन्यांमध्ये राज्य सरकारचे आरोग्य विभाग एमआयएस रॅकिंग हे ठरवून दिलेल्या मानांकनानूसार निश्चित करत असते.

यंदाच्या आर्थिक वर्षातील एप्रिल या पहिल्याच महिन्यांत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग नॉन कोविड कामामध्ये राज्यात पहिल्या स्थानावर आहे. नगर खालोखाल दुसर्‍या स्थानावर तीन जिल्हे आहेत. यात पुणे, नाशिक आणि पालघर यांचा समावेश आहे. तर राज्या सर्वात तळाला 34 व्या स्थानावर राज्याची उपराजधानी नागपूर आहे. राज्या सर्वाधिक 57 गुणांसह नगर पहिल्यातर नागपूर 14 गुणांसह राज्यात तळाला आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात करोनाची अँटीजेन चाचण्यांसह करोना सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांवर उपचार करण्यासोबत करोना लसीकरणांचे काम सुरू आहे. त्या कामासोबत नॉन कोविड काम सुरू असल्याने ग्रामीण भागातील महिलांना प्रसृतीसह अन्य आरोग्य सुविधा मिळत आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंंद्रात कोविड सुविधांनसह नागरिकांना विविध नॉन कोविड सुविधा देण्यात येत आहे. यामुळे नगर जिल्हा एप्रिल महिन्यांच्या नॉन कोविड कामाच्या उद्दिष्ट पूर्ण करण्यात राज्यात पहिल्या स्थानावर आहे. हे आरोग्य खात्याच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामामुळे शक्य आहे. तसेच भाविष्यात या कामगिरीत आरोग्य विभाग सातत्य ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिल.

– डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

- Advertisment -

ताज्या बातम्या