Friday, April 26, 2024
Homeनगरध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरातून शहरातून डीजेच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात 14 मंडळानी सहभाग घेतला होता. मिरवणुकीत डीजे लावून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी तसेच सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघघन केल्या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, संबंधित डीजे चालक-मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

पोना योगेश खामकर (वय, 39 वर्ष, नेमणूक कोतवाली पोलिस स्टेशन, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातून मिरवणुक काढण्यासाठी 14 मंडळांनी परवानगी घेतली होती. तसेच त्यांना नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. मिरवणुकीनिमित्त पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषण मापक यंत्राच्या सहाय्याने डीजेची डेसिबल घेण्यात आले. तसेच संबंधित मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व डीजे मालक-चालक यांना आवाजाची मर्यादा पाळण्याच्या वारंवार सुचना देण्यात आल्या. परंतु, संबंधित डीजे चालंकांनी ध्वनी प्रदूषण करुन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी संबंधित मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, डीजे चालक मालक यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या