Thursday, April 25, 2024
Homeनगरनो वॅक्सिन नगर शहरात नो एन्ट्री

नो वॅक्सिन नगर शहरात नो एन्ट्री

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आठ दिवसांपासून नगर शहरामध्ये (Nagar City) सातत्याने करोनाची रुग्ण (Covid 19 Patient) झपाट्याने वाढताना दिसत आहे. शनिवारी शहरामध्ये 256 सक्रिय रुग्ण (Active Patient) आहे. रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. करोनाचा संसर्ग (Corona Contagion) विषयांवर मात करायची असेल तर लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. 178 करोना रुग्णांमध्ये 52 रुग्णांचे लसीकरण (Vaccination) झालेले नाही. यावरून लस न घेतलेल्यांना करोनाचा धोका अधिक आहे. महापालिकेच्यावतीने (Municipal Corporation) लसीकरणाची मोहीम (Vaccination Campaign) जोरात सुरू करण्यात आली आहे. नगर शहरात ‘नो वॅक्सिन नो एन्ट्री’, (No Vaccine No Entry) शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ न देता कडक निर्बंध (Strict Restrictions) लावावे अशी शिफारस आरोग्य समितीच्यावतीने आयुक्त शंकर गोरे (Commissioner Shankar Gore) यांच्याकडे करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मनपा आरोग्य समितीच्यावतीने (Municipal Health Committee) करोना रुग्णवाढ (Covid 19 Patient) उपाययोजना संदर्भात शनिवारी संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे (Dr. Sagar Borude), नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, संजय ढोणे, सतीश शिंदे, सचिन जाधव, निखिल वारे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर (Dr. Satish Rajurkar), शशिकांत नजान व आरोग्य केंद्रातील डॉक्टर उपस्थित होते. समितीच्या सदस्यांनी विविध उपाययोजना सुचवतांना सांगितले की, लसीकरण वाढविण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करावी. ज्याठिकाणी लसीकरण कमी आहे. त्याठिकाणी कोविडची रुग्ण (Covid 19 Patient) संख्या वाढत आहेत.

तो भाग प्रतिबंधात्मक झोन म्हणून घोषित करावा. दक्षता पथकाने शहरांमध्ये फिरून लसीकरण व मास्क लावण्यासंदर्भात जनजागृती करावी, ओमिक्रोनचा संसर्ग झपाट्याने वाढत असून 15 जानेवारीपर्यत मोठी रुग्ण संख्या वाढलेली दिसेल. परंतु 90 टक्के नागरिकांना या आजाराचे लक्षणे दिसणार नाहीत. उर्वरित दहा टक्के नागरिकांपैकी दोन टक्केच नागरिकांना ऑक्सिजनची गरज भासणार आहे. जे नागरिक आत्तापर्यंत लसीकरणासाठी पुढे आले नाहीत, त्यांना करोनाचा धोका अधिक आहे. मनपा प्रशासनाने दंड आणि बंधनापेक्षा नागरिकांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून करोना रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे. यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. शहरात 261 परदेशावरून नागरिक आले आहेत. त्यांच्या करोना तपासण्या झालेली आहे. आता यापुढील काळात परदेशातून येणार्‍या नागरिकांना सात दिवस विमानतळावर रहावे लागणार आहे.

मनपाचे नटराज सज्ज !

मनपाचे 250 बेडचे कोविड सेंटर हॉटेल नटराज येथे तयार करून ठेवले आहे. याच बरोबर अतिदक्ष रुग्णांसाठी विळद घाटातील विखे हॉस्पिटल येथे सुविधा करण्यात आली आहे. मनपा या रुग्णांचे बिल आदा करणार आहे. परंतु औषध व इतर खर्च रुग्णांच्या नातेवाइकांना करावा लागणार आहे. मनपाकडे 30 हजार रेमडीसिव्हीरचा साठा उपलब्ध आहे. येत्या सोमवारी तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आ. संग्राम जगताप, महापौर, उपमहापौर व प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या