Friday, April 26, 2024
Homeनाशिक१९ ड्युरा सिलिंडर वापराविनाच पडून

१९ ड्युरा सिलिंडर वापराविनाच पडून

नाशिक । Nashik

आॅक्सिजन साठवण क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यास तमीळनाडूनहून २७ ड्युरा सिलिंडर कोटा निश्चित करण्यात आला.

- Advertisement -

जिल्ह्यास यापुर्वीच मिळालेले ७ सिलिंडर अद्यापही वापराविनाच पडून आहे. तर उर्वरीत १२ सिलिंडर देखील नुकतेच प्राप्त झाले, पण त्यांचाही वापर अद्याप तांत्रिक बाबींमुळे सुरुच झाला नसल्याचे समोर येत आहे.

करोना संसर्गाचा जिल्ह्यात प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर पहिल्या लाटेतच ऑक्सिजनचे महत्व रुग्णांसाठी अतोनात असल्याचे स्पष्ट झाले.

परंतू उपलब्धीसोबतच साठवणुकीची आणि सिलिंडरची अपुरी संख्या यामुळे यंत्रणेने लागलीच ही साठवण क्षमता वाढविण्यासाठी विविध प्रयत्न सुरु केले. त्यातूनच ड्युरा सिलिंडरचा पर्याय पुढे आला.

या एकाच सिलिंडरमध्ये अनेक जंम्बो सिलिंडरमध्ये साठविण्यात येणारा ऑक्सिजन साठवला जातो. त्यानुसार लागलीच तमीळना़डूला त्याची मागणीही करण्यात आली. २७ सिलिंडरची ऑर्डर करण्यात आली. त्यापैकी ७ सिलिंडर हे अनेक महिन्यांपुर्वीच मिळाले होते.

पण अद्यापही त्यांचा तांत्रिक बाबींमुळे वापर होत नाही. तर नव्याने पुन्हा १२ सिलिंडर जिल्ह्यास मिळाले, त्यातील काही मालेगाव मनपा, काही नाशिक मनपालाही िवतरीत करण्यात आले. पण त्यांचाही वापर होत नसल्याने सिलिंडर उपलब्ध होऊनही उपयोग नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.

एकीकडे ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. तो झाला तर अनेकदा पुढील काही दिवस पुरेल इतकी साठवणुकही करता येत नसल्याने चौहुबाजूंनी यंत्रणेची अडचण निर्माण झाली आहे.

वाढीव साठवण क्षमता उपलब्ध होऊनही त्याचा जिल्ह्यास कुठलाही उपयोग होत नसल्याचेच यातून स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या