Saturday, April 27, 2024
Homeक्रीडा८७ वर्षात प्रथमच 'रणजी ट्रॉफी' रद्द

८७ वर्षात प्रथमच ‘रणजी ट्रॉफी’ रद्द

दिल्ली | Delhi

भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे ही माहिती कळवली आहे.

- Advertisement -

दोन महिन्यांच्या बायो बबलमुळे रणजी करंडक स्पर्धा खेळवणे सद्यस्थितीत अवघड आहे. त्यामुळे मर्यादित षटकांचे अधिक सामने खेळवण्याचा BCCIचा प्रयत्न आहे. या स्पर्धांमधून प्रत्येक खेळाडूला प्रती सामना किमान १.५ लाख रुपये मिळतात. ”विजय हजारे ट्रॉफीसह वरिष्ठ महिला वन डे स्पर्धेचं आयोजन करणार असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. याशिवाय १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. २०२०-२१च्या हंगामात या स्थानिक स्पर्धा खेळवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,”असे शाह यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमधील कोणती स्पर्धा खेळवायची याबाबत BCCI मध्ये संभ्रम होता. त्यामुळे त्यांनी सर्व राज्य संघटनांना पत्र लिहून त्यांचं मत विचारलं होतं. त्यावेळी बहुतेक संघटनांनी विजय हजारे ट्रॉफी खेळवण्यास पसंती दिली होती. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) मात्र रणजी ट्रॉफी खेळवण्याच्या बाजूनं होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या